" हे बघ निशू s s s s s !! " सौ. श्वेतावहिनींचा आवाज आतां चंढला," ही बाटली घे, आणि शेजारच्या स्मिताकाकूंना देऊन ये लगेच... ...प्रत्येक गोष्टीत वितण्डवाद घालायचे नसतात !!... ...समजलं?"
१९९८ सालातल्या माघ महिन्याचे दिवस होते. माझा शाळामित्र पूर्णेन्दुकुमार ऊर्फ पी.के. घोष ह्याच्या घरीं आम्ही-म्हणजे मी व सौ. इंदिराजी (आमच्या सौ. सुमीता)-गेलो होतो, आणि घोष दांपत्याबरोबर गप्पा छाटत त्यांच्या दिवाणखान्यात बसलेलो होतो.
हा इन्दु ( पूर्णेन्दु चं लघुनाम ) आणि सौ. श्वेतावहिनी ( महाश्वेता नावाचं संक्षिप्त रूप ) हे शैक्षणिक क्षेत्रात कारकीर्द घडवणारं नामांकित जोडपं.
इन्दु हा संस्कृत भाषेचा पदव्युत्तर पदवीधर, तर सौ. श्वेतावहिनी तत्त्वज्ञानाच्या पदव्युत्तर पदवीधारिका होत्या.
दोघेही प्राध्यापकीच्या पेशात नावाजलेले... आणि सध्या आपापल्या विषयात पी. एच्. डी. करीत होते.
चि. निश्चय ऊर्फ निशू हे त्यांचं एकुलतं एक अपत्य... हा निशू त्यावेळीं वकिलीच्या पदवीच्या द्वितीय वर्षाचा स्नातक होता. त्यामुळं जात्याच वादविवादपटूही होता.
हे घोष दाम्पत्य आदल्या आठवड्यातच श्रीरामेश्वराचं दर्शन करून आलेलं होतं, आणि त्यांनी तीर्थप्रसादाला आम्हां दोघांना घरीं बोलावलेलं होतं.
माझं व्यवसायक्षेत्र जरी अभियांत्रिकीचं असलं, तरी मला संस्कृत आणि तत्त्वज्ञान ह्या दोन्ही विषयात पण बराच रस असल्यामुळं कुठंतरी आमच्या तारा जुळत असाव्यात. त्यामुळं ह्या जोडीबरोबर आमच्या गप्पा अगदी मस्त रंगायच्या. सौ. इंदिराजी चा विषय मराठी. असं सगळं अगदी छान जुळून आलेलं होतं.
त्यामुळं सौ. श्वेतावहिनीनी दूरध्वनीवर आमंत्रण देतांनाच बजावलेलं होतं की, ’ हे नुस्तं तीर्थ-प्रसादाचंच आमंत्रण नाही... ... तेव्हां गप्पामैफल रंगवायला भोजनाची तयारी ठेवूनच या.’ म्हणून मग आम्ही दोघे अर्ध्या दिवसाची रजा टाकून दुपारी चार वाजतांच ’इन्दु मोशाय्’ च्या घरीं थडकलेलो होतो.
चि. निश्चय सौ. श्वेतावहिनीना म्हणाला," अगं ममा... ...ह्या बाटलीत हे काय भरलंय्... ...पाणी च तर दिसतंय् हे... हे कश्यासाठी काकूना नेऊन द्यायचंय्? "
सौ. श्वेतावहिनी," ते रामेश्वराचं तीर्थ आहे... ...कळलं?"
चि. निशू," अगं पण असली तीर्थंबिर्थं पिऊन काय होतं गं ममा?... ...वर आणखी ती इतरांनाही वाटत बसायचं...कमालच आहे तुमची."
सौ. श्वेतावहिनी आतां उखडल्या," निरीश्वरवादी झालायस ना तूं...भणंग मित्रमैत्रिणीत वावरून !!... ... तुला काय कळणाराय् ह्या तीर्थ प्रसादग्रहणातलं मर्म?... ...श्रद्धा कश्याशी खातात हे तरी माहीत आहे काय तुला?... ...ऑं? "
चि. निशू," अगं पण हे तीर्थ च आहे हे खरं कश्यावरून? अन् ते रामेश्वराचंच आहे हे तरी खरं कश्यावरून गं? त्या कुठल्यातरी भटानं दिलंय् म्हणून? आणि हे प्यालं तर कल्याण होतं ह्याला तरी कांही आधार आहे काय? "
सौ. श्वेतावहिनी," तुला काय करायचंय् रे ह्या गोष्टीत नाक खुपसून? हे तीर्थ स्मिताकाकूंकडं नुस्तं पोंचवायलाच सांगितलं ना तुला? की तुला पण ते ग्रहण करायला सांगतेय् मी? उगीच नस्ता वाद घालत बसण्यापेक्षा पोंचवून आला असतास आतांपावेतो... ...समजलं?"
हा वाद आतां रंगणार असं वाटायला लागलं, अन् आम्ही तिघेही पुढं ऐकायला लागलो. पण चि. निशूबाबूचं शंकानिरसन कांही होईना.
त्यानं परत प्रश्न उपस्थित केला," ममा, समज... ... मी हे तीर्थ पोंचवलं म्हणून तुला सांगितलं, आणि प्रत्यक्ष्यात ते स्मिताकाकूंना दिलंच नाही, तर काय होईल?
सौ. श्वेतावहिनी," तसं तूं करणार नाहीस... ...मला खात्री आहे..."
चि. निशू," ठीकाय् ममा... ...पण असं समज, की मी वाटेत हे तीर्थ एखाद्या झाडाच्या बुंध्यात ओंतून टाकून ह्या बाटलीत शुद्ध नळाचं पाणी भरून ते स्मिताकाकूंना नेऊन दिलं... ... तर काय होईल? रामेश्वराचं तीर्थ म्हणून मोठ्या भक्तीनं ते घेतील ना त्या? काय होणाराय् त्यानं? कसलं पुण्य मिळणाराय् त्यांना हे पाणी पिऊन ?"
इतकं झाल्यावर मग सौ. श्वेतावहिनी कडाडल्या," हे बघ निशू... ... तूं शिकतोय्स वकिली... ...पण वकिली शिकून वादविवादी व्हायचं असतं... ...तुझा निव्वळ वितण्डवादी झालाय्... ...शुद्ध वितण्डवाद्याच्या पदरात कांहीही पडत नसतं... ...फक्त ढालगजपणा डोंक्यात मुरतो एव्हढंच... ...आणि इतरांना त्याचा फक्त उपद्रव होतो, उपयोग शून्यच ... ... समजलास? हे सगळं, ’माईक् जॅक्सन्’ ला देव्हार्यात बसवायला निघालेल्या तुमच्या पिढीच्या डोक्यावरनं जाणारं आहे...काय?!!! तेव्हां ती बाटली फक्त मुकाट पोंचवायची ताबडतोब... ... ...कळलं?"
चि. निश्चय बाटली घेऊन निघाला, तेव्हां इंदुमोशाय् म्हणाले," हे बघ निश्चय... ...संस्कृतात एक म्हण आहे... ...’वितण्डवादी नमोस्तुभ्यम्’ !!! त्यातली गम्मत ऐकायची असली, तर ते तीर्थ पोंचवून जर लगेच परत आलास तर तुला ती ऐकायला तर मिळेलच, पण तुझं झकासपैकी प्रबोधन पण होईल... ...काय? जा पळ."
," असं बघा नाना-नानी...
जगात वाद घालणारे लोक तीन प्रकारचे असतात...
पहिला प्रकार: वादी-प्रतिवादी => हे पण्डित असतात. ह्या लोकांना केलेला प्रतिवाद स्वतःला किंवा समाजाला पटणारा असला, तर तो मान्य होतो.
दुसरा प्रकार : हटवादी => हे फक्त पुस्तकपण्डित असतात. ह्या लोकांना केलेला प्रतिवाद फक्त स्वतःला आणि स्वतःलाच पटला, तरच ते तो मान्य करतात.
यच्चयावत् समाजाला जरी तो पटत असेल तरी ते तो मान्य करत नाहीत.
तिसरा प्रकार: वितण्डवादी => हे लोक सगळ्यात विनोदी असतात. हे पुस्तक पण्डितही नसतात आणि व्यवहारसूज्ञ पण नसतात. ते निव्वळ शंकासुर पढतमूर्ख असतात. त्यामुळं ह्या लोकांना कुणाचाच कसलाही प्रतिवाद कधीही पटत नाही.
प्रतिवाद्याचं अखण्ड खण्डण करीत बसणं एव्हढाच त्यांचा एकमेव आवडता उद्योग असतो.
’पडलो तरी नाक वर’ या म्हणीचे ते जणूं जिवन्त दृष्टान्तच असतात. !!
आणि भरमसाठ विचार करकरून बहुधा चुकीचे निष्कर्ष काढण्यातच ते पटाईत असतात.
अश्याच एका वितण्डवाद्याची ही एक मजेशीर कथा आहे.
मराठीत एक म्हण आहे ना ’निर्ल्लज्जम् सदासुखी’ अशी? हा अपभ्रंश आहे.
संस्कृतातलं मूळ सुभाषित आहे ’ त्यक्तलज्जो सुखी भवेत् ।’ आणि त्याची जन्मकथाही तितकीच मजेशीर आहे. ... ...
संपूर्ण सुभाषित असं आहे... ... ...
निर्ल्लज्जोब्राह्मणोनष्टः सलज्जश्च महीश्वरः ।
निर्ल्लज्जोधनिकोनष्टः सलज्जोयाचकस्तथा ॥
निर्लज्जोसाधुर्नष्टः खड्गपाणिश्चलज्जितः ।
निर्लज्जाऽङ्गनानष्टा सलज्जाश्च वाराङ्गना !! ॥
अतिगूढाऽस्ति सा लज्जा अगम्याकलनाय च ।
कस्माद्लज्जा समुत्पन्ना? को न जानाति पण्डितः ॥
निर्लज्जोहन्त्येकोहि सलज्जोबहुमानवान् ।
सारासारविचारेण त्यक्तलज्जोसुखीभवेत् !!! ॥
एकदां काय झालं, दोन पण्डितात तात्त्वज्ञानिक वाद उद्भवला.
दोघातला एक वादी-प्रतिवादी होता, तर दुसरा केवळ वितण्डवादी होता.
वादाचा मुद्दा असा होता की ’ लाजलज्जा बाळगणं माणसाच्या हिताचं असतं, की लाजलज्जा सोडणं हिताचं? ’
आतां ह्यात वाद घालण्यासारखं काहीतरी आहे काय?
पण खालील विवादात ह्या वितण्डवाद्यानं वादी पण्डिताला कसा पिदडलाय् ते बघा.
वादी नं पहिला सिद्धान्त मांडला -- "निर्ल्लज्जः ब्राह्मणः नष्टः।" -- [ ब्राह्मणानं लाजलज्जा सोडली, तर त्याचं वाटोळं होईल. ]
त्या काळच्या समाजात ब्राह्मण हा आदर्शवत् होता. त्यामुळं त्याचं हे विधान संयुक्तिकच होतं.
पण वितण्डवाद्यानं वाद उकरून काढला," सलज्जः च महीश्वरः।" -- [ राज्यकर्त्यानं लज्जालाज बाळगली, तर त्याचं वाटोळं होणार नाही काय? ]
निर्लज्ज राज्यकर्त्यांची अमाप जिवन्त उदाहरणं आपण आजच्या भारत देशांत दररोज बघत आहोत. !!.. ... काय नाना-नानी, खरं की नाही? "
इन्दुमोशाय् चं निर्विवाद परीक्षण ऐकून आम्ही खो खो हंसत कपाळांना हात लावले...!!!
इन्दुमोशाय् नी प्रवचन पुढं सुरूं केलं... ...
," नाना-नानी, वादी पण्डितानं मग दुसरा दृष्टान्त बाहेर काढला : "निर्ल्लज्जः धनिकः नष्टः।" [ श्रीमन्तानं लाजलज्जा सोडली, तर त्याचं अकल्याण होईल. ]
पण हे ही वितण्डवाद्याला पटेना. तो म्हणाला," सलज्जः याचकः तथा।" [याचक जर लाजायला लागला, तर त्याचंही अकल्याणच होईल की.! ]
आतां वादी पण्डिताला हे समजलं की समोर बसलेला पण्डित वितण्डवादी आहे, तेव्हां त्याच्यापुढं असा सिद्धान्त माण्डायला हवा, की ज्याचं खण्डण करणं दुरापास्त असेल. म्हणून त्यानं तिसरा सिद्धान्त माण्डला," निर्ल्लज्जः साधुः नष्टः।" [ साधुपुरुषानं लाजलज्जा सोडली, तर त्याचा विनाश होईल. ]
आतां ह्यात न पटण्यासारखं काय होतं?
तथापि वितण्डवाद्यानं त्या सिद्धान्ताचंही खण्डण केलं," खड्गपाणिः च लज्जितः।" [ योद्धा लाजायला लागला, तर त्याचाही विनाश होणारच. ]
आतां मात्र वादी च्या ध्यानांत आलं, की एखादा निरपवाद सिद्धान्त माण्डून ह्या वितण्डवाद्याच्या मुसक्या आवळल्याशिवाय हा कांहीही पटवून घेणार नाही.
तेव्हां त्यानं असा विचार केला की, मुळात लाजलज्जेचा संबंध हा जन्मतः पुरुषांपेक्षा स्त्रियांशीच ज्यास्त घनिष्ठ असतो. आणि ’लज्जा स्त्रीणां भूषणम्’ हे तर सर्वमान्यच आहे. तेव्हां ह्या मुद्यावर हा वितण्डवादी सफाचट निरुत्तर होईल.
म्हणून मग त्यानं ते अमोघ अस्त्र बाहेर काढलं," निर्ल्लज्जा अङ्गना नष्टा।" [ स्त्रियानी लाजलज्जा सोडली, तर त्यांची वाट लागेल. ]
तथापि समोर बसलेला पण जातिवन्त वितण्डवादी होता.!!
त्यानं तो सिद्धान्त पण खोडून काढत आव्हान दिलं," सलज्जाः च वाराङ्गनाः। !!! " [ गणिका जर लाजायला लागल्या, तर त्यांची पण वाट लागेल ना. !!! ]
आतां वादी पण्डिताच्या लक्ष्यात आलं, की ह्या वितण्डवाद्याला कांहीही - अगदी डोकं फोडून जरी - सांगितलं, तरी पालथ्या घड्यावर पाणी आहे. तेव्हां त्यानं वितण्डवाद्याला असं सुचवलं की, " बाबा रे, आपण आपल्या देशाच्या प्रधानाकडं हा लवाद नेऊं या. तो बुद्धिमान असल्यामुळं आपला वाद निकालात काढेल."
प्रधानाच्या कानांवर ह्या वितण्डवादी पण्डिताची कीर्ति होती.
सारं कथन ऐकून दोन्ही पण्डितांना तो म्हणाला की ’एखादा निष्पक्षपाती त्रयस्थ महापण्डितच तुमचा वाद निकाली काढूं शकेल”
असं सांगून त्यानं ह्या दोघांची त्याच्या परिचयातल्या एका त्रयस्थ महापण्डिताकडं रवानगी केली.
वादी-वितण्डवादी ना एव्हढंच ठाऊक नव्हतं, की तो महापण्डित एक तृतीयपंथी [ नपुंसक ] होता.!!
आतां जन्मतःच ज्याला लाजलज्जा कश्याशी खातात, ह्याची गंधवार्ता नसते, तो असला ’लज्जावाद’ कसा काय सोडवणार?
झालं... ...प्रधानानं सांगितल्याप्रमाणं हे दोघे विद्वान त्या महापण्डिताकडं गेले.
सगळं महाभारत ऐकून घेतल्यावर त्या महापण्डितानं ह्या दोघांना पहिलाच प्रश्न केला,
" काऽस्ति लज्जा?" [ "ही लज्जा-बिज्जा म्हणजे काय भानगड असते बाबानो? " ]
वादी आणि वितण्डवादी दोघेही त्या महापण्डिताकडं आ वांसून बघायला लागले, आणि वादी पण्डितानं स्वतःच्या कपाळाला हात लावला.!!
ते कांहीच बोलत नाहीत असं पाहिल्यावर तो महापण्डित पुढं म्हणाला," हे बघा पण्डितानों, लज्जेसंबंधी कांही स्पष्टीकरण देतां येत नसेल तुम्हांला, तर हा तुमचा वाद मी कसा काय सोडवणार?"
इतकं सांगून त्या महापण्डितानं दुसरा बॉंम्बगोळा टाकला," कस्माद् लज्जा समुत्पन्ना?" [ "ह्या लज्जे चा उगम तरी कुठे होतो? " ] !!
आतां वादी अन् वितण्डवादी दोघांनीही आपापल्या कपाळांना हात लावले... !!!
ते म्हणाले," पण्डितराज, आपल्या प्रश्नाचं उत्तर देणं अथवा खुलासा करणं हे आमच्या आवाक्याबाहेरचं काम आहे, तेव्हां आम्ही आतां निघतो. !!!
झालं असं, की हे वादी-वितण्डवादी जरी तिथून निखळले, तरी त्या वितण्डवाद्याची खुमखुमी कांही केल्या जिरेना, आणि तो मग दुसर्या यच्चयावत् पण्डितांना ते च प्रश्न विचारत सुटला," काऽस्ति लज्जा?" ," कस्माद्लज्जा समुत्पन्ना?"
अर्थात् त्याच्या ह्या प्रश्नांची उत्तरं द्यायच्या भानगडीत कुणीही पण्डित पडला नाही. सगळे पळून जायला लागले.!!
म्हणून तो वितण्डवादी परत प्रधानाकडं गेला.
चतुर प्रधानाच्या लक्ष्यात आलं की ह्या वितण्डवाद्याची आतां पुरती खोड तोडल्याशिवाय हा कांही वठणीवर यायचा नाही.
त्यानं त्या वितण्डवाद्याला सांगितलं," हे बघ बाबा, लाजलज्जेच्या बाबतीत कुणीही सुजाण नागरिक स्पष्टपणे कांही बोलत नसतात."
वितण्डवादी," मग काय करूं ? माझ्या शंकानिरसनाचं काय?"
राजनीतिज्ञ प्रधानानं मग त्याला सल्ला दिला," एखाद्या गणिकेला जाऊन विचार. केवळ तीच तुझं शंकानिरसन करूं शकेल.!! "
हा वितण्डवादी तिथून निघाला. डोक्यात विचारचक्र भिरभिरतच होतं," काऽस्ति लज्जा?... ... कस्माद्लज्जा समुत्पन्ना?"
योगायोगानं एका मन्दिरासमोरून जातांना त्याला एक गणिका दिसली.
झालं... ह्या वितण्डवाद्यानं तिला हटकलं, अन् प्रश्न केला," हे गणिके, काऽस्ति लज्जा?"
भर रस्त्यात विचारलेला तो तसला प्रश्न ऐकून त्या गणिकेनंच स्वतःच्या कपाळाला हात लावला. !!
आणि ती ह्या वितण्डवाद्याकडं चमत्कारिक नजरेनं बघायला लागली... ...!!
ती निरुत्तर झालेली बघून मग वितण्डवाद्याला चेव चंढला आणि त्यानं तिला पुढची शंका विचारली," कस्माद्लज्जा समुत्पन्ना? "
ती स्त्री एक गणिका असली तरी बुद्धिमान होती, आणि मर्यादाशील पण होती.
तिनं तत्क्षणीं वितण्डवाद्याच्या एक सणसणीत श्रीमुखात भडकावली... ...!!!
भर रस्त्यात हा प्रकार झाल्यावर त्या वितण्डवाद्याचा चेहरा शरमेनं लालबुंद झाला... ...
अन् गणिकेनं क्षणार्धात त्याचं सफाचट शंकानिरसन केलं," पण्डितराज, आतां समजलं काय ’कस्माद्लज्जा समुत्पन्ना?’ "
वितण्डवादी निरुत्तर होत स्वतःच्या कपाळाला हात लावून घरीं परतला... ...
पण त्याची शंका मात्र फिटलेली होती.!!
आणि एका सलज्जा वाराङ्गनेनंच त्याच्या स्वतःच्याच सिद्धान्ताला छेद देत ती निरपवादपणे फेडलेली होती. !!!!
वितण्डवाद्यानं घरीं जाऊन मग डोकं फुटेतोंवर विचारमंथन केल्यावर खालील सिद्धान्त मांडला... ...
’ लज्जा ही कांहीतरी फारच गूढ आणि समजायला अतिकठीण अशी गोष्ट असून तिची उत्पत्ति कुठून होते हे कुणीही पण्डित सांगूं शकत नाही. !!
तथापि असा निष्कर्ष कांढतां येईल, की ब्राह्मण - राज्यकर्ते, श्रीमन्त - याचक, साधूमहात्मे - क्षत्रिय, आणि कुलाङ्गना - वाराङ्गना ह्या जोड्यांमध्ये समाजात पहिल्या वर्गांच्या तुलनेत दुसर्या वर्गांचं एकूण संख्यात्मक प्रमाण विपुल असतं. तेव्हां हे दुसरे वर्ग जर बिघडले, आणि लाजलज्जा बाळगायला लागले, तर समाजाचं फारच मोठ्या प्रमाणात नुकसान होईल...!
प्रत्यक्ष्यातही असंच झालेलं आहे.
मी ’कस्माद्लज्जा समुत्पन्ना?’ हा प्रश्न करतांच सार्या लोकांवर लज्जा बाळगल्यामुळंच निरुत्तर व्हायची नी पलायन करायची नामुष्की ओंढवली - म्हणजेच सार्यांचं एकप्रकारे नुकसानच झालं - आणि मी मात्र लाजलज्जा सोडून देऊन हा प्रश्न धसाला लावल्यामुळंच आमच्या ’लज्जावादा’ चं निराकरण झालं !!... ...अर्थात् मुखभङ्ग झाला हे ही एक नुकसानच. पण ते माझ्या एकट्याचंच तर झालं. तथापि वाद निकाली निघाल्यामुळं समस्त समाजाचं भलं झालं, त्याचं काय? ... !!’
तात्पर्य: सुखी व्हायचं असेल, तर माणसांनी लाजलज्जा सोडून देणंच श्रेयस्कर असतं. !!! "
प्रवचन आटोपून पूर्णेन्दुमोशाय् चि. निश्चयबाबू कडं वळून म्हणाले," आतां कळलं काय निशू , की ’ वितण्डवादी नमोऽस्तुभ्यम्’ असं कां म्हणतात ते?"
पूर्णेन्दु मोशाय् चा तो धोबीपछाड प्रश्न ऐकून आम्ही स्तिमित होत चि. निश्चय कडं बघायला लागलो... ...
आणि वितण्डवादमार्तण्ड निश्चयबाबूनं सफाचट निरुत्तर होत स्वतःच्या कपाळाला हात लावला. !!!!!
*****************************************************************************************
-- रविशङ्कर.
२२ जानेवारी २०१५.

चि. निशू बाटली घेऊन संत्रस्त चेहर्यानं चालता झाला... ...
आतां कांहीतरी चमचमीत श्रवणभक्ति होणार हे उमजून आम्ही सरसावून बसलो, अन् श्री. इंदुमोशाय् नी त्यांचं प्रवचन सुरूं केलं... ... ...," असं बघा नाना-नानी...

No comments:
Post a Comment