" यंवडंच बोला, पोरीच्या अंगावर ईस तोळे सुनं घालायची कबलायत झालिव्ती कां नाय? मंग हाइत काय ह्ये डागिनं ईस तोळ्याचं... ऑं?"
नवरदेवाचा बाप अंगात आल्यागत गरागरा डोळे फिरवीत गरजला.
नवरीकडची माणसं सुन्न होऊन तोंडाला कुलूप बसल्यासारखी चिडीचुप् उभी होती.....