Search This Blog

Showing posts with label ॥ युरेका युरेका ॥. Show all posts
Showing posts with label ॥ युरेका युरेका ॥. Show all posts

Sunday, 27 October 2013

॥ युरेका युरेका ॥

॥ युरेका युरेका ॥



" या..... जावईबापू....!!
बसा बसा....कसे काय फिरकलात आज इकडं? बरी आठवण झाली आमची अचानक .... अं?"
बेलवलकर काका कॉटवरची गादी धपाधप्‌ थोंपटत म्हणाले.
मी कांही बोलायच्या आंतच स्वैपाकघराकडं वळत त्यांनी आगाही सुद्धां दिली
," अहो जरा बाहेर या.... बघा तरी कोण आलंय्‌ ते.... जावईबापू अन्‌ लेक आलेत.... नाष्टयाची सोय लावा पटकन्‌ कांहीतरी....
सकाळी सकाळीच आलेत... नाष्ट्याची पण वेळ झालीय्‌."
स्वयंपाकघरातनं उंच्यापुर्‍या काकी फडक्याला हात पुसतच बाहेर आल्या.
लेकीला बघताच काकींचा गौरवर्णी चेहरा नुस्ता फुलून आला.