Search This Blog

Showing posts with label ॥ उद्वाहन ॥. Show all posts
Showing posts with label ॥ उद्वाहन ॥. Show all posts

Saturday, 7 January 2012

॥ उद्वाहन ॥



" ओ काका, गाडी जरा पुढं घ्या की... जाऊं द्या आम्हाला."
माझ्या पुढं सिग्नलच्या चौकांत थांबलेल्या रिक्शावाल्यानं रिक्शातनं मुण्डी बाहेर काढत त्याच्या पुढं उभ्या असलेल्या स्कूटरस्वाराला हाळी दिली.
"अहो कुठं जाताय्‌? लाल दिवा दिसत नाही काय?" पुढचा स्कूटरवाला वतवतला.
"तुम्ही थांबा की हवं तर... नको कोण म्हणतंय्‌?" असं खेंकसत रिक्शावाल्यानं त्याला बगल देंत रिक्शा पुढं काढली...
चौकात ’सखाराम’ हजर नाही याची खात्री केली, अन्‌ लाल सिग्नल बेधडक तोंडून तो सुसांट निघून गेला.