Search This Blog

Friday, 3 April 2015

॥ व्यास-गणपति फॉर्म्युला ॥

॥ व्यास-गणपति फॉर्म्युला ॥




जगात विविध व्यक्तिमत्त्वांची अठरापगड प्रकारांची माणसं असतात.
कांही सदैव चिंतांत बुडालेली, तर कांही बघाल तेव्हां सदाबहार... ...अगदी प्रतिकूल परिस्थितीतून जात असतांनाही.
कांही नको तितकी काळजी करणारी, तर कांही अंतर्बाह्य बेफिकीर... ...अगदी निर्वाणीच्या प्रसंगातसुद्धां.
कांही शिराळशेटाचे अवतार, तर कांही सदैव कसल्या ना कसल्या उचापतीत गुंतलेले... ... ...
म्हणून तर जगातले व्यवहार विविधतेनें नटलेले आहेत, आणि या व्यवहारांचं अन्‌ पर्यायानं ते घडवणार्‍या मानवी स्वभावांचं निरीक्षण-परीक्षण आणि विश्लेषण करणं, हा माझा एक कायमचा आवडता उद्योग.
फार कश्याला, प्रस्तुत वेबसाईट्‌ चा जन्मही ह्याच उद्योगातनं झालेला आहे असं म्हणायला कांही हरकत नाही.

ह्या अठरापगड माणसांतली एक जोडी मात्र जरा वेगळी आणि विलक्षण असते... ... 
ती म्हणजे ’स्मार्ट’ किंवा ’चलाख’, आणि ’इण्टेलिजंट’ ... ... ज्याला मराठीत ’बुद्धिमान’ अथवा ’चतुर’ असं म्हणतात.
आजकालच्या ’टेक्‌सॅव्ही’ जमान्यांत बहुतेक सगळ्याच तरूण वर्गाला फक्त ’स्मार्ट’ होण्यातच रस असतो... ...
किंबहुना व्यावसायिक प्रशिक्षणात त्यांच्या मनावर ते पद्धतशीरपणे बिंबवलं जातं.
आणि ’स्मार्ट’ म्हणजेच ’इण्टेलिजण्ट’ अशी आजच्या तरूण पिढीच्या डोंक्यातल्या अनेक घातक गफलतीपैकी एक गफलत आहे... ...
’माहिती’ म्हणजेच ’ज्ञान’ ही जशी एक घातक गफलत आहे ना ... ... अगदी तशीच.
वास्तविक ’स्मार्ट’ आणि ’इण्टेलिजण्ट’ म्हणजेच ’चलाख’ आणि ’चतुर’ ह्या दोन मनोवृत्तीत जमीन अस्मानाचं अंतर असतं.
’चलाखी’ म्हणजे ’चातुर्य’ नव्हे.
कॉपी करून झटपट पास होण्याची जी घातक प्रवृत्ती आजकालच्या तरुण पिढीत बोकाळलेली आहे, तिच्या मुळाशी ही चलाख मनोवृत्तीच असते. असं करून आपण स्वतःलाच ’स्मार्टली’ फंसवतोय्‌ आणि स्वतःच्याच पायावर केव्हढा धोंडा मारून घेतोय्‌ , एव्हढंसुद्धां न कळण्याइतके ते ठार निर्बुद्धही असतात.
म्हणून तर पदवीची प्रमाणपत्रं मिरवणारे, पण प्रत्यक्ष्यात कांहीही अवगत नसणारे महाभाग हल्ली ठायीं ठायीं बघायला मिळतात.

’चलाख’ आणि ’चतुर’ ह्यातला फरक तात्त्वज्ञानिक किंवा मानसशास्त्रीय दृष्ट्या विशद करायचा म्हटलं तर एक तो एक मोठा व्यापच होईल.
पण थोडक्यात सांगायचं तर त्यांच्यातला मूलभूत फरक असा आहे... ...
चतुर माणसं स्वतःचं नुकसान कधी करून घेणार नाहीत, पण इतरांचंही नुकसान होऊं नये म्हणून ती सदैव दक्ष असतात... ...
’जगा आणि जगवा’ हा त्यांचा स्थायीभाव असतो.
चलाख माणसांचं मात्र तसं नसतं... ...किंबहुना ह्या बाबतीत ती सफाचट विधिनिषेधशून्य असतात. 
त्यांचं बोलणं-वागणं, आचारविचार हे नेहमीच आत्मकेंद्रित आणि तद्दन स्वार्थी असतात... ...
त्यामुळंच चतुर माणसं चलाख माणसांना नेहमीच दहा हात दूर ठेवत असतात... ...कधी गोड बोलून, तर कधी लाथा घालून... ... इतकाच काय तो फरक. 
आणि ’प्रत्येक माणसाच्या वाट्याला जे कांही येतं, ते त्याच्या स्वतःच्या लायकीनुरूपच येत असतं’ ह्या तत्त्वज्ञानाच्या आद्य सिद्धान्तानुसार या चलाख लोकांच्या वाट्याला आयुष्यभर फक्त चलाखीच येत राहते... ...!!!
ह्या सूक्ताचा प्रत्यय मला देणारी ही एक मजेशीर सत्यकथा... ... ... 

दुपारी कारखान्यातल्या आहारगृहात भरपेट जेवण उरकून मी माझ्या प्रकल्पावरच्या कार्यालयात परतलो, आणि वर्तमानपत्र चाळत जरा खुर्चीत लुढकलो... ...
१९९८ सालातल्या फेब्रुवारी महिन्यातली ती एक टळटळीत दुपार होती.
त्यावेळी मी पुण्यात ’टाटा मोटर्स’ मध्ये स्थापत्य अभियांत्रिकी विभागात नोकरीस होतो. जवळजवळ वीसएक वर्ष नोकरी झालेली असल्यामुळं बर्‍यापैकी वरिष्ठ पदावर काम करीत होतो. कंपनीच्या अवाढव्य पसार्‍यापैकी कॉलनी आणि फाउण्ड्री हे विभाग माझ्या अखत्यारीत येत होते.
हा पसाराही बराच मोठा असल्यानं प्रत्यक्ष  देखरेखीच्या कामाला हाताखाली दोन सहाय्यक अभियंते होते, आणि कंत्राटदाराची देयकं तपासून स्वाक्षरित करण्याची जबाबदारी मात्र मी स्वतःकडंच ठेवलेली होती.  
आमच्या स्थापत्य अभियंत्रिकीच्या क्षेत्रात ही जबाबदारी अतिमहत्त्वाची असते, कारण कंत्राटदाराचा नफातोटा हा ह्या मोजमाप अभियंत्याच्या कर्तृत्त्वावर थेट अवलंबून असतो, आणि ही धुरा सांभाळणार्‍याला ’क्वाण्टिटी सर्व्हेअर’ अथवा ’मोजमाप अभियंता’ असं म्हणतात.
आमचे कंत्राटदार ’मेहेरजी नसरवानजी’ यांच्या बाजूनं मात्र मोजमापं घेऊन दरमहा देयकं बनवण्यासाठी प्रत्येक प्रकल्पावर एकेक वेगळा, असे एकूण चारपांच अभियंते होते. 
त्यांपैकीच वाच्छानी आणि चटर्जी हे दोघे... ... ...पैकी वाच्छानी माझ्या अखत्यारीशी थेट संबंधित होता, तर चटर्जी हा पोखरकर नांवाच्या कार प्लान्ट सांभाळणार्‍या माझ्या सहकार्‍याशी जोडलेला होता.

ही जोडगोळी म्हणजे ’चतुर’ आणि ’चलाख’ मनोवृत्तीची प्रातिनिधिक रूपंच म्हणतां येतील अशी होती.
वाच्छानी हा तसा दिसायला सर्वसाधारण...किंचित भोटच वाटेल असा, पण बुद्धीनं तल्लख, चतुर, अन्‌ हजरजबाबी होता, तर चटर्जी म्हणजे चलाखी चा मूर्तिमंत अवतारच. दिसायला बरा, राहणी छाकटी, बोलण्यात नी पॉलिश लावण्यात हुषार, अन्‌ अंगावर आलेलं टोलवून लावण्यात महातरबेज.
’टाटा मोटर्स’ आणि ’मेहेरजी नसरवानजी’ ह्या दोन्ही बाजूंकडे भारताच्या विविध राज्यातनं नोकर्‍यावर आलेले लोक असल्यानं साधारणपणे हिन्दी हीच बोलीभाषा म्हणून आपसूकच वापरली जायची... ... आणि बहुतांशी ती ’बम्बईया हिन्दी’ च असायची... ...
तर मुखपत्रावरच्या बातम्या वांचून होताय्‌त न होताय्‌त तोंच ’वाच्छानी-चटर्जी’ ही जोडगोळी माझ्या कार्यालयात येऊन थंडकली.
दोघे माझ्या मेजासमोरच्या आसनांवर स्थानापन्न झाले. दोघांचेही चेहरे चिंताग्रस्त अन्‌ ओढलेले दिसत होते... ... ...

मी," क्या हुआ रे वाच्छानी?... ...सब ठीकठाक तो है न?... ... किस बातकी चिन्ता लगी है... ...ऑं?"
वाच्छानी," क्या बोलूं साब... ... आपने गालियॉं खिलवायी हमे... ...मेहेरसाब बहुत उखडा था आज सुबह... ..."
मी," क्यूं?... ...क्या हो गया?"
चटर्जी नं तो धागा पकडत चमकोगिरी सुरूं केली," नानासाब... ...आपने फेब्रुवारी के बिलमे इतनी काटाकुटी करके रख्खी है की क्या बताए?... ... बिल देखते ही मेहेरसाब उखड गया, और बरसने लगा हम दोनोंपर."
मी," आपपर बरसनेका कारण चटर्जी?
चटर्जी," अरे साब ये देखिये... ...ये कार प्लान्ट का पीछले मास का बिल... ...बिल्कुल खिचडी कर दी है पोखरकरसाब ने... ... ..."
मी," देखो वाच्छानी... ...और चटर्जी, आप भी सुनो... ...बिल अगर आप लोग गलत बनाओगे, तो उसमे काटाकुटी तो होनेवाली है ना?
अगर छपे हुए बिल में काटाकुटी नही चाहते हो, तो बिल नेकीसे और सही तरीकेसे क्यूं नही बनाते हो? "
चटर्जी," नानासाब, आप जरा पोखरकरसाब को बताइये ना, की इतनी काटाकुटी मत करो करके... ... ...बहोत मार खानी पडी आज.
वो क्या है ना साब... ...मै हूं कॉन्ट्रॅक्टर का इंजिनियर.... ...."
मी, " तो............?"
चटर्जी," तो हम लोग हमारे फायदेके हिसाबसे ही बिल बनानेवाले है ना?"
मी," फिर काटाकुटी हो गयी, तो रोते क्यूं हो?"
चटर्जी," साब... ...काटाकुटी होनेवाली है ऐसा हिसाब पकडकरही हम लोग बिल बनाते है !!... ...थोडीबहुत काटाकुटी तो चलती है साब, लेकिन ये देखिये... ...ये बिल ... ...पोखरकरसाबने पूरा खिमा बना दिया है बिल का काट काट के... ...तो मेहेरसाब हमे थोडेही ही छोडनेवाला है?... ...आप जरा बात करिए ना       पोखरकरसाबसे... ... ..."
मी," क्या बात करूं पोखरकर से?"
चटर्जी," सिर्फ ये कहिए की इतनी जबरदस्त काटाकुटी मत करो... ...थोडीबहुत ठीक है... ..."
मी," एक बात ध्यान मे रखो चटर्जी... ...पोखरकर को मै भलीभॉंती पहचानता हूं... ... काटाकुटी थोडी हो, या खिमा बनाना पडे, पोखरकर गलत बिल ऑंख     मून्दकर पास करनेवाला आदमी नही है... ...तुम ऐसा क्यूं नही करते?"
चटर्जी," क्या करूं नानासाब?"
मी,   " पहले ये बताओ मुझे, की मेहेरसाब को छपे हुए बिल मे हुई दुरुस्तियों से इतनी नफरत क्यूं हो गई ?... ...ऑ?"
आतां वाच्छानी नं तोंड उघडलं," क्या है साब... ... पीछले महिने के बिल जब हेड ऑफिस को भेजे गये ना, तब वहां से मेहेरसाब को भी दाण्डू मिला है, की छपे  हुए बिलों में बिल्कुल काटाकुटी नही होनी चाहिये, क्यूं की ऑडिट मे हेड ऑफिस को मार खानी पडती है... ..."
चटर्जी नं परत पॉलिश् लावायला तोण्ड उघडलं," आप जरा पोखरकरसाब को बोल दो ना नानासाब... ..."
मी," उससे कुछ फायदा नही होनेवाला है चटर्जी... ... बस्स... ...एक उपाय है... ..."
चटर्जी चा स्मार्ट चेहरा उजळला... ...आयता उपाय ऐकायला.
मी," रफ बिल बनाके, छपाई को भेजनेसे पहले ही पोखरकरसाब से जॉंच क्यूं नही करवा लेते?... ...इससे सब मुश्किले आसान हो जायेगी तुम्हारी... ..."
चटर्जी नं उडी च मारली," क्या बात है नानासाब... ... ...एकदम बेहतरीन आइडिया है... ...अब यही करता हूं... ...मै चलूं साब?
मार्च महिनेके बिल बीस तारीख के पहले पूरे करने है सबको... ...अच्छा साब, चलता हूं मैं" 

चटर्जी नं काढता पाय घेतला, आणि मी वाच्छानीकडं मोहरा वळवला," अब तुम्हारी क्या मुसीबत है वाच्छानी?... ...बोलो."
वाच्छानी," वही हाल है साब... ...पन्ने पन्ने पे काटाकुटी ... ...क्या करे?"
मी," देखो वाच्छानी... ...मै समझाता हूं... ...बिलमे अगर काटाकुटी नही होनी है ना, तो हर आयटम नेक हिसाबसे और सही तरीकेसे लिखना पडता है."
वाच्छानी," लेकिन मै तो नेकीसे ही बिल बनाता हूं ना साब?... ...आप को तो पता है."
मी," मै वही दोहरा रहा हूं वाच्छानी, की अगर सही नाप भी गलत तरीके से लिखोगे, तो काटाकुटी नही टलनेवाली है... ...अब आयी बात समझमे?"
वाच्छानी," समझ गया नानासाब... ...लेकिन आपका और मेरा भेजा बिल्कुल एकही तरीकेसे थोडेही चलनेवाला है?"
मी," तो फिर क्या करे वाच्छानी?"
वाच्छानी कांही वेळ सखोल विचारात हरवून गेला... ... ...मी शांतपणे त्याला निरखत होतो... ... ...
त्याच्या सुपीक डोक्यात कांहीतरी वावटळ भिरभिरत आहे एव्हढं मला समजलं... ... ...
पांचदहा मिनिटांनी त्याचा चेहरा एकदम उजळला, अन्‌ त्यानं चटाक्‌दिशी चुटकी वाजवली.!!
मी गप्पच होतो... ...
वाच्छानी," साब, एक फर्स्टक्लास आइडिया है... ... ... साप भी मरेगा और लाठी भी सलामत रहेगी... ...क्या कहते हो आप?"
मी," तरकीब तो बोलो वाच्छानी... ...या ऐसेही बिठाकर रखोगे मुझे तुम्हे तांकते?"
वाच्छानी,"देखो साब, हम दोनोंका भला है इसमे, लेकिन आपको मेरे लिये थोडीसी तकलीफ उठानी पडेगी."
मी," तकलीफ की फिकर मत करो वाच्छानी, सबका भला है ना?... ... ...चलो बोलो तुम्हारी आइडिया."
वाच्छानी," हम ’व्यास-गणपति फॉर्म्युला’ इस्तेमाल करेंगे."
मी," ये कौनसा नया फॉर्म्युला भेजेसे निकाला तुमने?"
वाच्छानी," व्यास गणपति ने क्या किया साब?"
मी," क्या किया?... ... ...महाभारत लिखा."
वाच्छानी," हां... लेकिन कैसे लिखा?"
मी," व्यासमुनी बोलते गये और गणपतिजी लिखते गये ."
वाच्छानी," हम भी वही करेंगे नानासाब." 
मी," मतलब?"
वाच्छानी," मतलब आप बोलते जाओ... ... ...मै लिखते जाता हूं." !!
वाच्छानी चं चतुर सुपीक डोकं बघून आतां मी च कपाळाला हात लावला. !!!
वाच्छानी," क्या है नानासाब, की मैने कैसे भी बिल बनाया, तो भी आप कहीं न कहीं काटाकुटी तो करनेवाले है ही !!... ... ...है ना?
तो मै कहता हूं की आपही बिल बोलते जाओ...और  मै लिखते जाता हूं... ... और वही भेजेंगे छपाई को... ... ... फिर काटाकुटीका सवालही पैदा नही होगा !! ... ...क्या?"
मी," और अगर मैने जानबूझकर गलत नाप या आयटेम बोल दिये ... ... ...तो?"
वाच्छानी,"नानासाब, आप काटाकुटी बहुत करते है बिलमे, लेकिन मैने आपकी काटाकुटियॉं गौरसे देखी है, और खात्री कर ली है की वे सौ प्रतिशत बराबर होती है... ... ...आप जैसे लोगोंको गलत बिलिंग कभी बर्दाश्त नही होता... ...मुझे पूरा भरोसा है आपके बिलिंग पर... ... ... 
आप सिर्फ इतना खयाल करो की बिल की रकम सही निकले... बस्स्‌... ... ...बाकी सही नापतौलकी पूरी जिम्मेदारी मेरी... ...ठीक है ना साब?"

वाच्छानीचा ’व्यास-गणपति’ फॉर्मुला तसा सगळ्यांच्याच भल्याचा दिसत होता... ... ... एकतर बिलं पटापट तयार होणार होती, आणि ती मी च सांगितल्याप्रमाणं केलेली असल्यामुळं, ती छापल्यावर परत अथ पासून इति पर्यंत मोजमापं तपासत बसायचा माझा वेळ आणि त्रास पण वांचणार होता. शिवाय नीटनेटकी आणि स्वच्छ बिलं झाल्यामुळं ऑडिटवाल्यांनाही त्यात खोड्या काढायला जागा शिल्लक राहणार नव्हती.
वाच्छानी," तो क्या कहते है आप नानासाब?"
मी," चलो ठीक है वाच्छानी... ... जैसा तुम चाहते हो... ...मुझे मंजूर है."
वाच्छानी," तो मै अभी जाऊं साब? आज बारा तारीख है, और मार्च महिना होनेसे बीस तारीखसे पहले कौनसी भी हालत मे अपने बिल निकल जाने चाहिये. तो मै सब के सब नाप लेके आपके पास आ जाता हूं परसों...याने के चौदह तारीख को, और फिर ... ..."
मी," और फिर ’आप बोलते जाओ, और मै लिखते जाता हूं !!!... ... यही ना वाच्छानी?"
वाच्छानी नं कपाळाला हात लावून डोळे मिचकावत मला टाळी दिली, आणि क्लायण्टच्याच अभियंत्याला कामाला लावायच्या त्याच्या चातुर्याची दाद देत मी कपाळाला हात लावून हंसायला लागलो.!!! 

ठरल्याप्रमाणं वाच्छानी चौदा मार्चला सकाळीच ढीगभर वह्यांची बाडं कांखोटीला मारून माझ्या कॉलनीतल्या कार्यालयात हजर झाला... ... ... 
मी बोलत गेलो, आणि तो लिहून घेत गेला... ... अक्षरशः ’व्यास-गणपति’ च्या थाटात. !! 
सतरा मार्चच्या दुपारपर्यंत एकजात झाडून सगळीच्या सगळी बिलं छपाईच्या वाटेला लागली... ...
आणि अठ्ठावीस मार्चच्या दुपापावेतों तपासून अकौण्ट्स खात्याकडं रवाना पण झाली... ... ...!!!
अश्या तर्‍हेनं वाच्छानीचा ’व्यास-गणपति फॉर्म्युला’ अपेक्षेबाहेर यशस्वी ठंरला.

वर्ष अखेर एकदाची संपली, आणि एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मी चारएक दिवस रजा काढून परगांवी गेलो.
सात एप्रिल ला रजेवरून परतलो, तर सहकार्‍यांनी पदोन्नती झाल्याबद्दल माझं अभिनन्दन केलं.!!
खासगीत एकानं मला सांगितलं पण की ’तुमच्या इलाक्यातल्या उत्तम वक्तशीर नी खाडाखोडीविरहित बिलिंग ची साहेब बरीच तारीफ करीत होते’ म्हणून.!!!
सहकार्‍यांचे आभार मानून मी सकाळच्या प्रकल्पावरच्या  देखरेख फेरीला बाहेर पडलो... ...
फाउंड्री च्या जागेवर पोंचतोय्‌ न पोंचतोय्‌ तोंच कंत्राटदाराच्या लोकांनी बातमी दिली की वाच्छानीला पण पदोन्नती जाहीर झालेली आहे... ...
मी मनातल्या मनांत वाच्छानी च्या ’व्यास गणपति’ फॉर्म्युल्याला साष्टांग नमस्कार घातला... !!!
तो इतका पॉवरफुल् असेल असं मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. !!!!
तिथल्या सुपरवायझर्सनी सांगितलं की मेहेर साहेब भरसभेत वाच्छानीची तोंडभर स्तुती करीत होते म्हणून... ...
लवकरच तो बिलिंग विभाचा प्रमुख होणार अश्या वावड्याही उठल्या होत्या, कारण त्या जागेवरचा अभियंता पुढच्याच वर्षी सेवानिवृत्त होणार होता.
वाच्छानीच्या भोळसट दिसणार्‍या चेहर्‍याआड दडलेल्या तल्लख अन्‌ चतुर मेंदूचं मला कौतुक वाटलं... ...

दुपार व्हायला लागली, नी मी कंपनीतल्या भोजनगृहाकडं जेवायला जाण्याआधी हात धुवायला माझ्या कार्यालयातल्या बेसिनकडं निघालो, तेव्हढ्यात वाच्छानी आलाच.
आल्या आल्याच दणकून हस्तांदोलन करीत त्यानं माझं अभिनन्दन केलं... ... ...मीही त्याचं तोण्डभरून अभिनन्दन केलं.
वाच्छानी," चलो साब... ...आपको लेने आया हूं मै"
मी चमकलोच," चलो?... ...कहां जाना है वाच्छानी?... ...चलो मेरे साथ खाना खाने को... मै अभी कॅण्टीन की ओर ही निकल रहा था."
वाच्छानी," कॅण्टीन को गोली मारो साब... ... ...आपही चलो मेरे साथ... आज बाहर खाना खाएंगे... ... ...आपको पार्टी देनी है मुझे... ...प्रमोशन की."
मी," अरे पार्टीकी इतनी जल्दी क्या है वाच्छानी? मुझे भी तो पार्टी देनी है तुम्हे... ..."
वाच्छानी," आपकी पार्टी बादमे करेंगे साब... ...पहले मेरी... और वो भी अभी के अभी... ...चलो साब... ... एक घण्टेमे वापस आएंगे खाना खाकर."
त्याच्या उत्साहावर मला विरजण घालवेना... ...आम्ही जवळच्याच एका हॉटेलात जाऊन स्थानापन्न झालो.

वाच्छानी," थॅंक्यू नानासाब, आपके बहुत धन्यवाद... ... ..."
मी," मेरे धन्यवाद?... ... ...मै कुछ समझा नही वाच्छानी ... ...धन्यवाद  किसलिए ?"
वाच्छानी," साब अपना ’व्यास गणपति फॉर्म्युला’ मानने के लिये... ... ...ये प्रमोशन उसीकी वजहसे मिला है मुझे."
मी चाटच पडलो," मेरे धन्यवाद क्यूं वाच्छानी?... ... तरकीब तो तुम्हारी थी ना?... वैसे गौर किया जाए, तो मुझे ही तुम्हे धन्यवाद देने चाहिये."
वाच्छानी," नही साब... ... सिर्फ तरकीब सूझनेसे क्या होता है भला? उसकी कदर करके साथ देनेवाला तो होना चाहिये ना?... ...इसलिये आपको धन्यवाद...अगर आप मेरा सुझाव ठुकरा देते, या मुझपे भरोसा नही करते... ... ... तो क्या हो सकता था?"
मी," सच बात तो ये है वाच्छानी, की सबका भला करनेवाली ऐसी बेहतरीन तरकीबें सूझनेके लिये ’इण्टेलिजण्ट’ दिमाग की जरूरत होती है... ...चटर्जी जैसे ’स्मार्ट’ लोगों के बस की ये बात नही है." 
वाच्छानी," चटर्जी की बात आपने अभी निकाली साब... ... ...लेकिन मै तो टाल रहा था... ..."
मी," क्यूं?... ...क्या हो गया?"
वाच्छानी," प्रमोशन की मीटिंग मे चटर्जी की खटिया खडी हो गयी साब... ...आपने कुछ सुना नही?"
मी," नही तो... ...क्या हो गया?"
वाच्छानी," मेहरसाब बहुत बुरी तरह बरसे चटर्जी के ऊपर... ...प्रमोशन तो गयाही... ...और ऊपरसे दम मिला उसको, की यदि बिलिंग मे अगले महिनेतक सुधार नही हुआ, तो नौकरीसे भी हाथ धोना पडेगा... ..." 
मी," ये अच्छा नही हुआ वाच्छानी... ... ...कैसे भी हो, वो अपने साथ काम करता है."
वाच्छानी," सच बताऊं साब?... ... ...जानना चाहोगे?"
मी," हां जरूर... ...बोलो वाच्छानी."
वाच्छानी," चटर्जी ज्यादा होशियारी करने गया पोखरकरसाब के साथ... ...और फंस गया बुरी तरहसे... आप को तो मालूम है पोखरकर साब कितना माहिर और पहुंचेला आदमी है... ... ..."
मी," लेकिन हुआ क्या?"
वाच्छानी," ये अपना ’व्यास गणपति फॉर्म्युला’ है ना साब, उसका चटर्जी को कहींसे पता चल गया... ...कैसे पता चला, ये मुझे भी नही मालूम...और वो चक्कर उसने पोखरकरसाब पे चलाया."
आतां आ वांसत मी च कपाळाला हात लावला.!!!"
वाच्छानी," वैसे सब जुगाड बराबर जम गया था साब... ...पोखरकरसाबके साथ मैने भी काम किया है ... ...जम गया तो बहुत दिलदार आदमी है...  ...किसीका नुकसान करनेवाला तो बिल्कुल नही है... ... ...लेकिन ये चटर्जी है ना साब... ...बहुत स्मार्ट समझता है खुदको... ...और असलियतमे तो ऐसे लोगही गधों के उस्ताद होते हैं. !!!
अभी देखो साब... ...एक बार हमने एक दूसरेपर भरोसा जताया, तो वैसेही चलना चाहिये ना? आपने बताये हुए एक भी बिल मे मैने कभी कुछ फरक  करके छपवाया क्या?...नही ना? यही भरोसावाली बात नही घुसी उसके दिमागमे.  
हुआ ये की मार्च महिनेका कार प्लान्ट का बिल बताते समय पोखरकरसाब के दिमागसे दो-तीन आयटम छूट गये थे... ... ...वैसे कौन सा आसमान गिर गया था उसमे? अगले महिनेके बिलमे साबको याद दिलाके चटर्जी वो आयटम ले सकता था ... ...भरोसे की गांठ तो पक्की रहती थी ना? 
चटर्जी ने वो तीनों आयटम उनको बगैर बताये बिलमे घुसाड दिये... ...वो भी गलत नापों के साथ... ...और कुछ अधूरे आयटम भी जोड  दिये साथ मे... ... ... 
और तो और, ऊपरसे झगडा भी किया पोखरकरसाब से साथ... ... ...
फिर जो हुआ, उससे अलग क्या होनेवाला था? 
पोखरकर साब ने तो पूरा राडा करके रखा है बिल का... ... 
और हैरानी की बात तो ये है की जो काटाकुटी पोखरकरसाब ने करके रखी है ना, वो सौ फी सदी बराबर है !!!
खुद मेहेरसाब भी अभी  नही जा सकते है उनके पास बिल लेकर... ... चटर्जी को बराबर लटका दिया पोखरकरसाब ने... ... ...अभी रो रहा है... ... ...
वो क्या है ना साब... ... ... जो हुआ, सो अच्छा नही हुआ... ...
लेकिन ये खुद को स्मार्ट समझनेवाले यह बात कभी नही समझ पाते है, की ज्यादा होशियारी कहॉं नही चलनेवाली है... ...उसका क्या इलाज है? 
अगर हो सके, तो आप जरा बात करके देखिए पोखरकरसाब से... ... ...
कम से कम चटर्जी की नौकरी तो बच जायेगी... ... ..."
        
इतकी बातमी सांगून वाच्छानी त्याच भोळसट चेहर्‍यानं माझ्याकडं बघायला लागला... ... ...
आणि चटर्जी सारख्या ’चलाख’ माणसाचंही भलं करूं पहाणार्‍या त्याच्या चातुर्याला दाद देत मी स्वतःच्या कपाळाला हात लावून त्याच्या पाठीमागं स्कूटवर माण्ड घातली.!!!!



*****************************************************************************************

रविशंकर.
४ मार्च् २०१५.   

No comments:

Post a Comment