Search This Blog

Showing posts with label ॥ ३ जी ॥. Show all posts
Showing posts with label ॥ ३ जी ॥. Show all posts

Thursday, 2 February 2012

॥ ३ जी ॥




’ओरिएन्टल कोम्प्युटर्स’ च्या दुकानांत तोबा गर्दी उसळलेली होती........
दुपारची साधारणपणे चार साडेचारची वेंळ असावी.
मी माझा कॉम्पुटर खराब झालेला असल्यानं सर्व्हिसमनला पाठवायचा निरोप देण्यासाठी ओरिएन्टल कोम्प्युटर्स मध्ये गेलो होतो, पण काउंटरवर तर कुणीच मोकळं दिसत नव्हतं.

तोंकड्या जीन्स्‌ आणि टॉप्स्‌ चंढवलेल्या, डोंळ्यावर ठार काळे गॉगल्स लावलेल्या, केंसांचा अवतार केलेल्या, मोबाईलच्या बटणांशी अखण्डपणे चाळे करणार्‍या,
कानांत इअरफोन्स्‌ची बुचं ठांसलेल्या, अन्‌ च्युइंगम्‌ चंघळणार्‍या फॅशनेबल विशी पंचविशीतल्या पोरांपोरींनी दुकान नुस्तं ओंसण्डून वाहत होतं.