" आज इकडं कसे काय? पतूं बरी आहे ना ?", पुढ्यांत नाष्ट्याचं भरगच्च ताट ठेंवीत माझ्या सासूबाईनीं विचारलं.
१९७६ सालांतल्या ऐन हिवाळ्यातल्या एका प्रसन्न सकाळी मी सासर्यांच्या घरी बसलो होतो.
सासरे फिरायला बाहेर गेलेले. सासूबाई घरी एकट्याच होत्या.... नव्हे, तसा मुहूर्त साधूनच मी घरी गेलो होतो.