॥ एकलम् खाजे - दुब्बी राजे ॥
डहाणूकर कॉलनी सर्कल् ला वंळसा घांलून ’टेल्को’ ची पहिल्या पाळीची बस थांबली, अन् वांचत असलेलं पुस्तक बंद करून मी बॅगेत ठेंवलं.
दुपारचे साडेतीन वाजत आलेले होते......... कॉलनीतल्या बहुतेक इमारतीत सामसूम दिसत होती.
पांठीमागच्या बाकड्यावरच्या आमच्या ’फिरकी गॅंग’ मध्ये उतरायची गडबड सुरूं झाली.
सौ. इंदिराजी नी सकाळी कारखान्यात निघतानांच बजावलेलं होतं.....
’दिवाळीची खरेदी करायला रविवारांत जायचं आहे.
आणि फर्निचर च्या दुरुस्त्यासाठी सुतार पण गांठायचा आहे.....तेव्हां आज जरा लवकरच या चार वाजेपर्यंत.’
मी जरा ढंकलाढंकली करत उतरायची घाई करायला लागलो.....
तसा बाबा तावडे म्हणाला," काय नाना.... आज उतरायला फारच गडबड झालेली दिसतेय्.....
’सहाचा शो’ गांठायचा आहे की काय वहिनींबरोबर?"
"शो कसला आलाय् रे.....मागं लचाण्ड लावलंय् बायको नं. ", म्हणत मी पटकन् खाली उतरलो.
नोव्हेंबर महिन्यातले थंडीचे दिवस असल्यानं त्या दुपारच्या वेळीही हंवेत जरा गारवा च वाटत होता.
घर गांठायला जरा उशीरच झाला होता, म्हणून तरांतरां चालत सर्कलला वळसा घालून मी आमच्या नऊ नंबरच्या गल्लीत वळलो.....
अन् कानांवर रस्त्यात खेंळणार्या पोरांटोरां चा तालबद्ध स्वरांतला गलका आदळला.......
’ एकलम् खाजे....अष्टिक नल्ले.....तिराण भोजे.....धस्सि गुलाबा......’
काय होतंय् कळायच्या आंत सभोवतीचं जग चक्क वितळायला लागलं. !!
इमारती अंधुक झाल्या....रस्ते , झाडं , वाहनं , गुरंढोरं , सगळंच पुसट अंधुक होंत होंत दिसेनासं झालं........
अन् क्षणार्धांत मी पांचएक वर्षांचा होऊन आमच्या लहानपणीच्या ’सणगर गल्ली’ त अलगद जाऊन पोंचलो.!!!
प्रत्यक्षांत आमच्या डहाणूकर कॉलनीतल्या घरासमोरच पोराटोरांचा गोट्यांचा खेंळ ऐन भरांत रंगलेला होता.
दहाबारा पोरं गोट्या खेंळत होती......दुपारची आडवेंळ असल्यामुळं आख्खा रस्ताभर त्यांना मोकळं रान मिळालेलं होतं.....
दोघंतिघं एका पायावर हनुमान बैठक मारून गोट्यांचा नेम धंरत होती.....
अन् बाकीच्यांची तालासुरांत ’पोलीस बॅण्ड’ च्या शिस्तीत आपापली गणती चाललेली होती.......

मला अक्षरशः हर्षवायू च व्हायचं काय ते बाकी राहिलं.....
हा खेंळ खेंळत खेंळतच तर मी लहानाचा मोठा झालो होतो.!!
हा गोट्यांचा खेंळ फार मजेशीर असतो.
रस्त्यात मधेच एक गोलाकार वाटीसारखा खळगा पाडलेला असतो, त्याला म्हणतात ’सई’
ह्या ’सई’ पासून दहा फुटावर एक सरळ रेंघ आडवी मारलेली असते.....तिला म्हणतात ’फज्जा’.
खेंळ सुरूं करतांना प्रथम एकेकजण ह्या ’फज्जा’ वर उभा राहून ’सई’ त गोटी फेंकतो.....ह्या प्रकाराला म्हणतात ’चकणं’
चंकल्यावर ज्यांच्या गोट्या थेंट ’सई’ त पडतील, ते खेळाडू दुसर्यांना पिदडायला मोकळे होतात....म्हणजेच ’गण्ड’ होतात.
ज्यांच्या गोट्या ’सई’ त पडत नाहीत, त्या खेंळाडू नां ’ह्यन्नी’ अशी उपाधी चिकटते.
सगळ्यां खेंळाडूनी उरलेल्यांचं चंकून होईपर्यंत थांबायचं असतं.
चकणं झाल्यावर मग खरा खेंळ सुरूं होतो.
साखळी क्रमानं प्रत्येकाची पाळी येते, आणि ’गण्ड’ खेंळाडू ’ह्यन्नी’ खेळाडूंच्या गोट्या आपापल्या गोटीनं उडवतात.
आणि ’ह्यन्न्यां’ नी आपापल्या गोट्या हाताच्या मुठीनं ’सई’ त ढंकलून पाडायच्या असतात.
’सई’ त गोटी पडली, की मगच ’ह्यन्नी’ चा ’गण्ड’ होतो.
गोटी मारतांना एका पायावर गुडघा दुमडून हनुमान बैठकीत बसायचं.
उजव्या हाताचा अंगठा दुमडलेल्या पायाच्या माण्डीवर उभा रोंवून दोन्ही हातांच्या बोटांच्या चिमटीत गोटी पकडायची.
आणि लगोरीसारखा नेम मारून दुसर्यांच्या गोट्या उडवायच्या.......ह्याला म्हणतात ’आट्टी मारणं’.
ज्याचा नेम अचूक त्याची ’आट्टी’ भारीतली मानली जाते. ह्या ’उस्तादां’ ना गोट्यांच्या खेंळात फार मोठा मान असतो.
अश्या बारा जणांच्या गोट्या उडवल्या की तो खेंळाडू राज्य घेण्यातनं सुटतो.
आणि असं करत करत शेंवटी शिल्लक उरलेल्या ’गण्ड’ अथवा ’ह्यन्नी’ वर राज्य येतं........
आणि मग त्याची लंगडी घालत घालत रस्ताभर धिण्ड काढली जाते.
ही जी बारा टोल्यांची सुस्वर तालबद्ध गणती असते, तिला म्हणतात ’एकलम् खाजे.’
ही गणती येणेप्रमाणे चालायची.....
पहिला टोला = एकलम् खाजे
दुसरा टोला = दुब्बी राजे
तिसर टोला = तिराण भोजे
चंवथा टोला = चार चौकटी
पांचवा टोला = पंचल पाण्डव
सहावा टोला = संयल दाण्डव
सातवा टोला = सत्तिक टोले
आंठवा टोला = अष्टिक नल्ले
नववा टोला = नऊ नऊ किल्ले
दहावा टोला = धस्सि गुलाबा
अकरावा टोला = अक्कल खंरकटा
बारावा टोला = बाळू मर्कटा.
म्हणजे थोंडक्यात सांगायचं, तर ह्या खेंळात प्रत्येकाचा, ’बाळू मर्कटा’ होण्यासाठी, अक्षरशः जिवाचा आटापिटा चाललेला असायचा. !!
कांही कांही ’टेस्ट मॅच’ मध्ये तर ही टोलेगणती पंचवीसपर्यंत पण जायची....
चोंवीसाव्या टोंल्याची गणती व्हायची ’चोर’, आणि पंचविसाव्या टोल्याचं नांव ’हरामखोर.’
गोट्या खेंळल्यामुळं लहानपणीं मला इतकंच कळायचं की ’बाळू मर्कटा’, ’चोर’, अथवा ’हरामखोर’ झालं, की राज्य करतां येतं.!!
मोठा झाल्यावर समजलं, की आपल्या देशात पिढ्यान्पिढ्या तहहयात चाललेला राष्ट्रीय खेळ ’गोट्या’ हाच असणार....’हॉकी’ नव्हे.
कुठ्ल्याही निवडणुका आल्या, की हाच खेंळ गल्लीपासून दिल्लीपर्यंत, गल्लोगल्लीं हमरीतुमरीवर येत खेंळला जातो.
’अक्कल खंरकटा’ झालेले विधानसभांत जातात....!
’बाळू मर्कटा’ झालेले लोकसभा गाजवतात.......!!
’चोर’ व्हायला जमलेले विविध पक्षांचे सरचिटणीस होतात..... !!!
अन् ’हरामखोर’ चा बहुमान प्राप्त झालेले पक्षाध्यक्षपद भूषवतात.......!!!
आणि मग राज्य डोंक्यावर घेंतलेल्या ’ह्यन्नी’ जनतेची, लंगडी घालत, गल्लीपासून दिल्लीपर्यंत,
कोपरं-ढोंपरं फुटेंस्तोंवर, गल्लोगल्लीं यथेच्छ धिण्डही काढतात...!!!!!
जय हो.............मेरा भारत महान. !!!!!!
तर झालं असं, की काय होतंय् हे कळायच्या आंतच मी हातातली बॅग आमच्या सोसायटीच्या आवारातल्या
एका झाडाच्या फांदीला लंटकवली, अन् त्या पोरांच्या घोंळक्यात शिरलो.
पोरं जर बावचंळलीच....
मी," काय रे पोरांनो......मी येऊं काय खेंळायला?"
पोरं हंसायला लागली....त्यातलं एक धीट पोरगं ओंरडून बाकीच्यांना म्हणालं," ए पक्या....ए आंद्या....काका बघा काय म्हणताय्त."
पक्या पुढं आला," काय हो काका?"
मी," मी येऊं काय खेंळायला?"
पक्या," तुम्ही गोट्या खेंळतां काका?......खीः खीः खीः खीः!! "
सगळीच पोरं आतां खीः खीः खीः खीः करायला लागली. !!!
मी," हो ..........मी पण गोट्या खेंळलोय् लहानपणी."
पक्या," तुमच्याकडं गोटी आहे खेळायला काका?"
मी," नाही बुवा....तुम्ही कुणी गोटी देंत असलात, तर येतो बघ खेंळायला."
पक्या," आट्टी मारतां येती काय तुम्हाला?"
मी," हो येती की.............दांखवूं काय मारून?"
पक्या," ए आंद्या.......तुझी गोटी दे जरा काका ना.............आट्टी बघूं या काकांची."
आंद्या नं खिश्यातली गारगोटी कांढून माझ्या हातावर ठेंवली.........
पक्या नं साधारण आठएक फूट अंतरावर स्वतःची गोटी जमिनीवर ठेंवली.
खेंळात प्रवेश हवा असेल, तर ही ’प्रवेश परीक्षा’ अनिवार्य होती.!!
पण लहानपण अंगांत आधीच शिरलेलं असल्यानं माझं कांहीही अडलं नाही.......
एखाद्या कसलेल्या उस्तादाच्या थांटात मी तळहात रस्त्यावरच्या मातीत घांसून
आणि पॅण्ट च्या पार्श्वभागीं पुसून ’ऑईल फ्री’ केले.!!
अन् एका पायावर हनुमान बैठक मारत नेम धंरून गोटी मारली.......
आणि अहो आश्चर्यम्......’प्रवेश परीक्षे’ च्या टोल्यालाच पक्याच्या गोटीच्या फाड्दिशी ठिकर्या उडाल्या. !!
पक्या च्या टीमवाल्या पोरांनी मला अक्षरशः खांद्यावर उचलला. !!!
गोट्यातला ’सचिन तेंडुलकर’ सापडल्यासारखा पोरांचा आनंद गगनांत मावेना.
मी पक्या च्या हातावर खिश्यातनं अधेली कांढून ठेंवत म्हणालो," जा पळ....दोन गोट्या आण लंवकर....एक तुला....एक मला."
पक्या धांवत जाऊन पळत आला, अन् त्यानं एक नवीकोरी गोटी माझ्या हातावर ठेंवली.
पक्या," चला रे सुरूं करूं या......काका आमच्या टीमकडणं खेंळणार."
झालं............. आतां पोरांच्यात भाण्डणं लागली.......
आंद्या," ए....ऐका रे......काका आमच्याकडणं खेंळणार.....आट्टी मारायला मी गोटी दिली काकांना."
पक्या," ए...जा रे जा..... फू....ट !!.....काकां ना कुणी आणलंय खेंळायला?"
गोट्या बाजूलाच राहिल्या......आणि आतां ’पक्या-आंद्या’ चा ’फ्रीस्टाईल रोड शो’ च सुरूं झाला.!!
अखेर ’काका’ नी मध्ये पडून तह घंडवून आणला, की ’काका आज आंद्या कडणं आणि उद्यां पक्या कडणं खेळणार.’
माझं पुढच्या महिनाभराचं ’बुकिंग’ दहा मिनिटांत पार पडलं...... आणि खेंळ सुरूं झाला......
चंकून झालं.....मी धंरून आंठजण ’गण्ड’ झालो......बाकीचे बाराचौदा जण ’ह्यन्नी’ झाले.
आणि गल्लीत परत एकदां ’गोटिनामाचा’ तालबद्ध सुस्वर गजर सुरूं झाला............

हळूं हळूं गल्लीच्या रस्त्यावरची वर्दळ सुरूं झाली.........
शाळातनं घरी परतणारी पोरंपोरी खेंळ बघायला गोळा झाली.........
’ एकलम् खाजे....अष्टिक नल्ले.....तिराण भोजे.....धस्सि गुलाबा........’
नुस्ता कल्ला उडाला. !!
गल्लीतनं संध्याकाळचं फिरायला, भाजीबाजाराला, निघालेले शेजारीपाजारी माझ्याकडं हंसून बघत येतजात होते.....
हळूं हळूं तो गदाडा इतका वाढला, की आजूबाजूच्या इमारतीतल्या खिडक्या-गच्च्यांत
आमच्या शेंजारणी-पाजारणी पण तो तमाशा बघायला गोळा झाल्या....!!!
धूळमातीनं माखलेल्या मला त्या कश्याचंही भान नव्हतं.......
कानांत फक्त एकच गजर घुमत होता.......

चाळीस वर्षांच्या वनवासानंतरच्या पहिल्या पदार्पणातच मी बघतां बघतां ’धस्सि गुलाबा’ पर्यंत मुसण्डी मारली.!!!
आतां ’अक्कल खरकटा’ झाला रे झाला, की मग ’बाळू मर्कटा’ च काय तो बाकी होता.
मी गुडघ्यावर हनुमान बैठक मारून उजव्या हाताचा अंगठा मांडीवर रोंवला.......
गोटी बोंटाच्या चिमटीत पकडून थेंट एकलव्याच्या थांटात नेम धंरला..........
अन् एखादा चालूं चित्रपट अचानक स्थिर अन् निःशब्द व्हावा, तसं कांहीतरी घडलं. !!
एकजात सगळी पोरं एकदम ’शिवाजी म्हणतो’ स्टाइलमध्ये आपापल्या जागीं पुतळ्यासारखी गोंठली.....!!!
माझं चित्त विचलित झालं......अन् नजर सभोंवती फिरली.
खिडक्या-गॅलर्यांत सामना बघत उभ्या असलेल्या आमच्या शेंजारणी-पाजारणी पण स्तब्ध झालेल्या.....
आमच्या घरासमोरच्याच इमारतीच्या गच्चीत उभ्या असलेल्या एक शेंजारीणबाई
मला डोंळ्यानीच खाणाखुणा करीत होत्या ’पांठीमागं बघा’ म्हणून.........
कांहीतरी ’बल्ल्या’ झालेला आहे एव्हढं माझ्या लक्ष्यांत आलं, अन् मी उठून उभा रहात मागं वळून बघितलं.....
अवतीभंवती पसरलेली माझी बालपणीची ’सणगर गल्ली’ क्षणार्धात कापरासारखी विरघळत विरून गेली.......
अन् मला जाग्यावर फेंफरं यायचंच काय ते बाकी राहिलं........!!!
पुढ्यातच सौ. इंदिराजी ’हिटलर’ च्या काळीज कांपवणार्या थंडगार नजरेनं माझ्याकडं एकटक बघत उभ्या होत्या.!!!!
भर गल्लीत मी कपाळाला हात लावून सौ. इंदिराजीं कडं बघतच राहिलो. !!!!
सौ. इंदिराजी," घरीं चला." !!
मी," अगं तूं हो पुढं......मी आलोच मागोमाग.....शेंवटचे दोनच टोले लगावायचे बाकी राहिलेत बघ....ते झाले की येतो लगेच."
सौ. इंदिराजी," बॅग उचला, न् घरी चला मुकाट....माझे पण दोनच टोले लगावायचे बाकी राहिलेत.!! "
आख्ख्या गल्लीत हंश्याच्या ऍटमबॉम्ब् चा धंडाका उडाला.!!!
गच्च्या-खिडक्यातल्या शेंजारणी आतां फिदीफिदी हंसायला लागल्या......
खेंळातली पोरं तर खदांखदां हंसायला लागली.....!!!!
खेंळाचा विचका तर झालाच......
वर आणखी पदार्पणातच अगदी हातातोंडाशी आलेला ’बाळू मर्कटा’ ही हुकलेला होता.
पण कांही कां असेना....तब्बल चाळीस वर्षांनी माझ्या ’सणगर गल्ली’ त पोंटभर खेंळायला तर मिळालं होतं.
मी अंगावरची धूळमाती झंटकून माझी ऑफिसची बॅग उचलली........
अन् ’भगतसिंग’ च्या थाटांत सौ. इंदिराजींपुढं चार पावलं, घराकडं चालायला लागलो.!!!
घरांत गेल्यागेल्या सौ. इंदिराजींच्या ’घनगर्ज’ तोंफेचा धंडाका उडाला...........
आख्खी सोंसायटी हांदरायला लागली.....माझी श्रवणेंद्रियं शाबूत राहिली एव्हढंच काय ते नशीब.
हुतात्मा होतां होतां मला दिसलं की घराच्या उघड्या खिडकीजवळ ’पक्या-आंद्या’ उभे होते.....
अन् चंवड्यावर उभे रहात टांचा उंच करकरून घरांत डोंकावून बघत होते. !!
’घनगर्ज’ तोंफेचा मोहरा आतां ’पक्या-आंद्या’ च्या दिशेत फिरला.....मला बिचार्यांची विलक्षण दया आली....
’भगतसिंग’ च्या पांठोपांठ आतां ’सुखदेव आणि राजगुरू’ ची पण गच्छन्ती निश्चित होती.!!!
सौ. इंदिराजी," काय रे कारट्यानों.....काय बघताय् डोंकावून खिडकीतनं?....काय तमाशा चाललाय् काय इथं?
सुटा आपापल्या घरांकडं मुकाट, नाहीतर एकेकाची बुडं सडकून काढते आता."
आंद्या," मी कांही नाही केलं काकू....मी घरला जात होतो सरळ....
हा ’पक्या’ च मला घेऊन आलाय् बघा इथं.........मला म्हणाला......."
सौ. इंदिराजी," काय म्हणाला हा ’पक्या’ तुला?"
आंद्या," हा ’पक्या’ मला म्हणाला की................"
सौ. इंदिराजी," का.........य म्हणाला हा ’पक्या’ तुला?"
आंद्या," हा ’पक्या’ मला म्हणाला की ’काकू आतां काका ना कसं बडवताय्त ते बघायला चल’ म्हणून." !!!
हुतात्मा झालेला ’भगतसिंग’ च आतां पोंट धंरधंरून खदांखदां हंसायला लागला........!!!!
अन् खुद्द सौ. इंदिराजीनी च आवाक् होत स्वतःच्या कपाळाला हात लावला. !!!!!!
आंखणी केलेल्या सार्या कामांचा फज्जा उडाला होता.
फर्निचर दुरुस्तीची कामं तर अगदी गळ्याशी आलेली होती.
दुसर्या दिवशी सकाळी कारखान्यांत जातांनाच बसमध्ये मी ’शर्या’ ला तांतडीनं सुतार पाठवायला सांगून ठेंवलं.
दुसर्या दिवशीची दुपार. ’टेल्को’ ची आमची बस घराच्या दिशेनं धांवत होती......
दुपारचे सव्वातीन झालेले.......
कालच्या महाभारतामुळं, मागच्या बाकावरच्या आमच्या ’फिरकी गॅंग’ मध्ये, मी पुस्तकात तोंड खुपसून गप्प बसलो होतो.....
काल गल्लीत माझा ’भगतसिंग’ झालेलाच होता....तर आज बस मध्ये ’हुतात्मा दिन’ साजरा व्हायचा योग होता. !!
दिल्या," बाबा.....शर्या....तुम्हाला कळली काय रे कालची ’रंगारंग’ बातमी?"
मी गप्पच....
बाबा," काय झालं रे दिल्या?"
दिल्या," काल ’नाना’ नं गल्ली गाजवली म्हणे.......आख्ख्या कॉलनीभर पसरलीय् बातमी."
बाबा," काय झालं ते सांगशील तरी?....काय रे ’नाना’.....काय गोंधळ घातलास काल?"
मी फिस्कारलो," दिल्या सांगतोय् ना.......त्यालाच विचार की."
दिल्या," अरे बाबानों, काल ’नाना’ नं आख्खी गल्ली जमवली....बाया-बाप्ये-पोरंटारं....अगदी झांडून सगळी गोळा झाली होती.!!"
शर्या," ए बाबा......दिल्या ला पण खरं काय ते माहीत नाहीय्.....मला विचार."
बाबा," बोल बोल....काय केलं ’नाना’ नं?"
दिल्या चं ’शीघ्रकवित्त्व’ आतां जागं व्हायला लागलं," गाडीत केली हाणामारी....न् धांवत सुटली ’नाना स्वारी’ !!! "
बाबा," मी विचारलं ’सहा चा शो’ गांठायचाय् काय वहिनीबरोबर?’,
तर म्हणाला की ’बायको नं मागं लचाण्ड लावलंय्’ म्हणून......"
शर्या," सगळ्या थापा.......ह्या ’नाना’ नं च वहिनींच्या मागं लचाण्ड लावून दिलं......."
दिल्या," काय सांगतोय्स काय?"
शर्या," ’नाना’ ला काल ’शो’ च गांठायचा होता....पण ’सहा’ चा नव्हे.....’तीन’ चा."
बाबा," म्हणजे?.....मी नाही समजलो."
शर्या," ’नाना’ च्या घरीं कोणकोण असतात माहीत आहे?"
बाबा," त्यांत आहे काय माहीत नसायला?.....हज्जारदां गेलोय् ’नाना’ च्या घरीं....नाना, वहिनी, न् दोन मुलं.....बस्स."
शर्या," आतां मला सांगा.......काल शाळांना सुट्ट्या होत्या काय?"
बाबा," काय बोलतोय्स शर्या तूं....सगळ्याच शाळा काल सुरूं होत्या....."
शर्या,"अर्थात् नाना ची पोरं पण शाळांत गेलेली असणार.....
म्हणजे पोरांच्या गृहपाठांचं लचाण्ड, ’नाना’ च्या मागं वहिनीनी लावलेलं नव्हतं....बरोबर?"
बाबा," अगदी बरोबर....."
शर्या," आतां झालं असं, की काल हा ’नाना’ बसमधनं उतरून घरी पळत सुटला, तेंव्हां वाजले होते साडेतीन....."
बाबा," हात्तिच्या !!.....म्हणजे एव्हढा आटापिटा करून ’नाना-नानी’ चा ’तीन चा शो’ अखेर चुकलाच म्हण की."
शर्या," तो थिएटर ला लागलेला....."
बाबा."म्हणजे....................?"
’फिरकी गॅंग’ मधले ’शीघ्रकवि’ आतां चौखूर उधळले............
दिल्या ," म्हणजे ’ ’चुकला शो’ आला कामीं...न् साडेतीन चा ’मुहूर्त’ नामी !! ’.......कळलं?"
सगळ्या ’फिरकी गॅंग’ नं आतां कान टंवकारले.....
बाबा," नाही कळलं......अरे ह्या ’नाना’ चा ’मुहूर्त’ काल चुकलाच ना शेंवटी?"
शर्या," ’मुहूर्त’ कसा काय चुकवील? ’नाना’ आहे तो....
आतां असं बघा....
दुपारची साडेतीन ची वेंळ..... म्हणजे गल्ली त शुकशुकाट..... अन् शेंजारीपाजारीं पण सामसूम....."
दिल्या,"आणि पोरंही शाळांत गेलेली....म्हणजे ’नाना’ च्या घरांत पण सन्नाटा......"
शर्या," अर्थात, वहिनी घरांत एकट्याच असणार....
तीन चा शो गांठायला नटून थंटून ’नाना’ ची वाट बघत.....अगदी मोगर्याचा गजरा बिजरा माळून......काय?
तेव्हां, ’ घंमघंमणारी मोगरावेंणी.....न् घरांत मोकाट ’नाना-नानी’ !!! ’........समजलं? "
दिल्या," हीः हीः हीः हीः हीः .... म्हणजे ’ ’घरच्या शो’ ची लज्जत न्यारी.... न् ’नानागल्ली’ त गर्दी भारी ’ !!!! "
शर्या," समजलं कां आतां तरी? "
एक बाबा तावडे तेंव्हढा सोंडून बाकी सगळी ’फिरही गॅंग’ आतां फिदीफिदी हंसायला लागली. !!!
बाबा," हॅ हॅ हॅ हॅ...काय लेको पांचकळणा चांलवलाय् तुम्हीं....उगीच आपलं ’नाना’ ऐकून घेंतोय् म्हणून.....
मला सांगा......’नानागल्ली’ त भारी गर्दी जमली असेल,
तर ’नाना-नानी’ काय करतील घरांत कोंडून घेंऊन?..........ढेंकळं?"
दिल्या," काय करतील?....अरारारारारा....वहिनी नीं ह्या ’नाना’ चं पार ’पानिपत’ करून ठेंवलं.!!!!....आहेस कुठं ?..........
गल्लीतली पोरंटारं पण खिडक्यातनं डोंकावून बघत होती म्हणे. "
शर्या," ’पानिपत’ झालं ह्या ’नाना’ चं.....पण ’ धारातीर्थीं ’ भलतेंच पडले !!!"
बाबा," म्हणजे?.....मला नाही कळलं....."
शर्या," सांगतो.....’नानागल्ली’ त गर्दी उसळली होती हे खंरंय्.....
पण ती ’नाना-नानी’ नं ’मुहूर्ता’ चं सोनं केल्यानंतर....कळलं?"
बाबा," साल्यानों.... ’मुहूर्त’ टंळून गेंल्यावर मग गर्दी कश्याला उसळली होती?.....हवापाण्याच्या गप्पा मारायला?"
शर्या," अगदी भोट आहे तूं बाबा.....’शहीद स्मारक’ बघायला.....!!! "
बाबा," म्हणजे रे शर्या? "
शर्या," हा ’नाना’ आज सकाळीच बसमध्ये माझ्याजंवळ ’फर्निचर’ च्या दुरुस्तीसाठी सुताराची चंवकशी करत होता....!!!! "
बाबा," आरं तिच्यायला....म्हणजे ’ घरीं बिचारे ’राजा-राणी’.....न् गल्लीत फिरली ’मोगरावेणी’ ’ !!!!......हीः हीः हीः हीः.... "
बाबा तावडे सकट आख्खी बस आतां कपाळानां हांत लावून फिदीफिदी हंसायला लागली.!!
अन् ’फिरकी गॅंग’ नं आतां टाळ्या पिटत भजन पण सुरूं केलं......
" गाडीत करून हाणामारी
धांवत सुटली ’नाना स्वारी’
पोरं शाळेत, ’नानी’ घरीं
’चुकल्या शो’ ची लज्जत न्यारी " !!!
आतां तर बसचालक मारणे सुद्धां कच्कन् ब्रेक मारून, खीः खीः खीः खीः करायला लागला.!!!
उरलो फक्त मी च एकटा......
मग मी पण पुस्तकातनं डोकं बाहेर कांढून कपाळाला हात लावत, त्या हास्यधंबधंब्यात अंघोळीला उतरलो. !!!!!
****************************
-- रविशंकर.
१२ फेब्रुवारी २०१४.

No comments:
Post a Comment