Search This Blog

Thursday 29 June 2023

|| तुका म्हणे ... भाग २ ||

|| खेळण्यापरी खेळणं ||

 

संत तुकाराम हे माझे अत्यंत आवडते संत कवि...

संत म्हणूनही...आणि असामान्य रचनाकार म्हणूनही... ...

पण तुकोबांवर माझं मनापासून प्रेम असण्याचं तिसरं च एक व्यावहारिक कारण आहे... ...

तें म्हणजे आजतागायत त्यांच्या ओंव्यानीं मला सौ. इंदिराजींच्या तंडाख्यातनं अगणित वेळां सफाचट वांचवलेलं आहे...अगदी बालंबाल.....

सौ. इंदिराजी फंणफंणल्या, की ' तुका म्हणे...' अशी सुरुवात करून एक पदरची, प्रसंगाला साजेशी ओंवी त्यांना ऐकवायची...की झालं...

अश्यांपैकी हा दुसरा किस्सा... ...

," बाई बाई बाई... ...अहो हें हें हें काय आरंभलंय तुम्ही...ऑं ?”

सौ. इंदिराजी माझ्या हातातला चि. अथर्व ऊर्फ भीमाप्पां च्या खेंळण्यातला भोंवरा माझ्या हातातनं हिसकावून घेंत गंरजल्या...”

मी, “ कुठं काय आरंभलंय मी...?”

तश्या सौ. इंदिराजी आणखीनच संतापल्या..., “ काय आरंभलंय म्हणून उलट मला च विचारताय तुम्ही ?... ...हें...हें...हें...काय भदं करून ठेंवलंय तुम्ही ' पापा ' च्या भोंव-याचं ? ”

मी सौ. इंदिराजीं च्या हातातनं भोंवरा कांढून घेत उत्तरलो, “ कांही नाही हो...ह्या भोंव-याच्या डोंक्यावर एक लोखंडी आंकडा बसवत होतो... ..."

सौ. इंदिराजीं, “ कसल्या कसल्या नस्त्या विध्वंसक उचापतीं उगवतात तुमच्या डोंक्यात...तुम्हांला च ठाऊक... ...पण कश्यासाठी हे असले उपद्व्याप आरंभलेत तुम्ही ?"

मी, " तर हा आंकडा पिरगाळून बसवतांना अर्धा आंत च तुटून बसलाय...म्हणून टोच्या नं त्याच्या आजूबाजूचा भाग जरासा टोंकरून कांढत होतो...तुटलेला आंकडा बाहेर काढायला... ...”

सौ. इंदिराजी नीं कपाळाला हात लावला, “ ह्या ला काय ' ' जरासं टोंकरणं ' म्हणतात काय ?...आणि हें आज कसलं काय नवीन खूळ शिरलंय तुमच्या सुपीक डोंक्यात ?... ...धन्य आहे बाई तुमची..."

मी तुकोबां चा धांवा केला, “ तुका म्हणे... ...”

सौ. इंदिराजीं, “ पुंडलीक वरदा हा ऽ ऽ ऽ ऽ रि विठ्ठल...!! ...हं बरळा आतां काय तुमच्या ओंव्या असतील त्या...!!!”

मी,      तुका म्हणे सुविचार | जतन करावा भंगार

            कामीं येई फार | अडचणीत ||”

सौ. इंदिराजी, “ छान...वा वा वा...म्हणजे ह्या चांगल्या खेंळण्याचं पार वाटोळं करून भंगार निर्माण उद्योग आरंभलाय तर तुम्ही... ...कळलं ?...अर्धं अधिक वाटोळं झालेलं दिसतंच आहे त्याचं...आतां बाकी उरलेलं पुरतं वाटोळं पण करून टांका एकदाचं...!!...काय ?”

असं वंतवंतून माझ्या हाताच्या तळव्यावर तो भोंवरा फाड् दिशी आंपटून दंणा दंणा पाय आपटत सौ. इंदिराजी स्वयंपाकघराकडं चालत्या झाल्या...

मुळात झालं असं होतं, की सकाळी चि. भीमाप्पा अति च पिडायला लागले, तेव्हां सौ. इंदिराजी नी, “ ह्या ला जरा सांभाळा अर्धा तास तरी" म्हणून फर्मान कांढलेलं होतं.

तसा चि. भीमाप्पांच्या खेंळण्यांच्या ढिगा-यातला, माझ्या लहानपणींच्या काळातल्यासारखा दोरी गुंडाळून फिरवायचा भोंवरा बाहेर कांढून मी चि. भीमाप्पांना खेंळवत बसलेलो होतो... ...


दोरी गुंडाळून भोंवरा फिरवायची गंमत कळल्यावर भिमाप्पा पिडायचे थांबले...आणि सरळ तांठ उभा राहून वेंगात गरागरा फिरणारा भोंवरा बघितल्यावर तर ते जाम खिदळायला लागले...फिरणारा भोंवरा हातात पकडण्यासाठी कोण धांदल उडाली त्यांची... ...


भीमाप्पा खूष झाले खंरे, पण तो सरळ तांठ उभा राहिलेला भोंवरा बघून अस्मादिकांच्या डोंक्यात एक किडा वंळवंळला, आणि तिथनंच सगळ्या महाभारताला सुरुवात झाली होती... ...मला केवळ त्या भोंव-याच्या डोंक्यात मधोंमध एक पोलादी आंकडा पिळून बंसवायचा होता. म्हणून मी भोंकं पाडायचं अवजार बाहेर कांढून त्या जागीं एक भोंक पाडून घेंतलं होतं, आणि त्यात हातानं च पिरगाळून एक आट्यां चा आंकडा बसवत होतो, तर जेम तेम अर्धं आंत गेल्यावर तें बेणं च तुटलं, आणि अर्धं आंत च अडकून बसलं... ...!!

आतां त्याच्या आजूबाजूचा थोडासा भाग टोंकरून त्याचं टोंक मोकळं तर करायला हवं...त्याशिवाय तें पकडीत धंरून बाहेर कसं काढणार ? म्हणून मी तो भाग टोंच्यानं जरासा टोंकरून काढला होता... ...आणि त्यावरून उपरोक्त सगळं महाभारत घडलं...

तें कांही कां असे ना...सौ. इंदिराजी वंसवंसल्या, याखेरीज अधिक फारसं कांही बिघडलेलं दिसत नव्हतं...भोंवरा तर त्यांनी हातातनं सोडलेला होता ना ?... ...तेव्हां डोंक्यात आलेला प्रयोग करून बघायला मी मोकळा होतोच की... ...

मी मग तें काम पुरं करायला जी कांही हत्यारं लागणार होतीं, तीं सगळीं हत्यारांच्या खणातनं प्रथम बाहेर कांढून घेतलीं... ...इतकीं ढीगभंर खेळणी दिसल्यावर मग भीमाप्पां ची पिरपिर एकदम गायब च झाली... ...आजो बरोबर त्यांना दुरुस्ती चं काम करायचं होतं ना ?...आजो ला हंवी असलेली हत्यारं कांढून द्यायला, आणि काम झालेलीं परत खंणात ठेंवून द्यायला हे ' हप्पाडी मेस्त्री ' मदतीला हाताशी होतेच की... ...मग काय, आम्ही भंराभंर सगळा गदाडा पूर्ण करून टांकायच्या मागं च लागलो... ... ...

मी मग भोंव-याच्या माथ्यात अडकून बसलेल्या त्या आंकड्याच्या आजूबाजूचा भाग टोंकरून सर्वप्रथम आंकड्याचं टोंक मोकळं करुन घेतलं...मग पकडीत तें टोंक धंरून उलट दिशेनं फिरवत बाहेर कांढून टांकलं.

नंतर दुसरा नवीन आंकडा मोकळ्या झालेल्या वेंजात सावकाश सावकाश, तो तुटणार नाही अश्या बेतानं पिरगाळून घट्ट बंसवून टांकला...

मग फेंकून न देतां जपून ठेंवलेल्या भंगार वस्तूं च्या साठ्यातनं कसल्यातरी स्वयंपाकाच्या भांड्याची एक गोलाकार लाकडी मूठ शोंधून कांढली. ती भोंव-याच्या कमाल व्यासाच्या मापात व्यवस्थित कांपून घेंतली. अश्या त-हेनं जी खिट्टी तयार झाली, तिच्या लांबी च्या मधोंमध व्यसाच्या दिशेत, भोंव-याची दोरी ओंवतां येईल इतपत आकाराचं एक आरपार भोंक पाडून घेंतलं, मग त्यातनं दोरी ओंवून तिच्या दोन्ही टोंकांना, खिट्टी दोरीतनं निघणार नाही अश्या पध्दतीनं गांठी मारून टांकल्या... ...

आणि डोंक्यातली कल्पना वास्तवांत साकारल्याबद्दल स्वतः च स्वतःची पांठ थोंपटून मोकळा झालो...!!

भोंव-याचा कायापालट आतां असा झालेला होता की, दोरी त्याला व्यवस्थित गुंडाळून अडकवून ठेंवतां येत तर होतीच...शिवाय सुटी दोरी खेळायला घेऊन घंरभंर कुठंही टांकून द्यायच्या भीमाप्पा नां लागलेल्या संवयीचंही निराकरण आपोआप च झालेलं होतं...

तिसरा फायदा म्हणजे दोरीला खिट्टी असल्यामुळं भोंवरा फिरवतांना ती बोटांच्या बेंचकळ्यात अगदी चंपखल अडकून बसायला लागली, अन् चि. भीमाप्पा नां भोंवरा हाताच्या पकडीत नीटपणे धंरतांही यायला लागला...

इतकं सगळं होईतोंवर सौ. इंदिराजी दुपारचा साडेचार चा चहा घेऊन आल्या...आणि तो सगळा उद्योग बघतांच त्यांचा चेहरा उजळला, “ हा च उपद्व्याप चाललेला होतां होय तुमचा दोघांचा ?... ...छान झालाय भोंवरा...आतां घंरभंर दोरी शोंधायची माझी कटकट तर टंळलीच आणि पापा ला तो हातात नीटपणे धंरताही येईल फिरवायला छानपैकी... ...वा वा...छान...”

सौ. इंदिराजीं च्या तोंडातनं हें असलं कांही ऐकायची संवय नसल्यामुळं मी जरा बांवचंळलोच...तरी उसन्या अंवसानानं म्हणालो, “ झालंय ना छान सगळं ?...काय ?...तुमचे उगीचच गैरसमज आहेत नव-याबद्दल... ...”
सौ. इंदिराजी असलं कांही ऐकून घेत नसतात, “ माझ्या समजा-गैरसमजां चा प्रश्न च नाही इथं... ...”
मी, “ मग काय माझ्या गैरसमजांबद्दलचा प्रश्न आहे हा...?”
सौ. इंदिराजी, “अर्थात्...”
मी, “ धन्य आहांत तुम्ही...माझा कसला काय गैरसमज ?”
सौ. इंदिराजी, “ गैरसमज हा, की ' आपली बायको कजाग कैदाशीण आहे...तिला नव-या चं कांही चांगलं दिसत च नाही...वगैरे वगैरे... ...आतां बघा...हे काम खरंच छान झालंय...त्याला दाद दिली की नाही मी ?...काय ?”
मी, “ अहो...आत्तां जें कांही झालं, तो तुमच्या बाबतीत अपवाद म्हणावा लागेल...!!!”
इतका जमेल तेव्हढा वंचपा कांढून, चंवताळून सौ. इंदिराजीं चा तोफखाना सुरूं व्हायच्या आंत च तिथनं मी पळ काढला... ...
फक्त मी जे कांही केलेलं त्यांना दिसलं, तें मी नेमकं कश्यासाठी केलेलं होतं, तेंव्हढंच त्यांना सांगितलं नाही...म्हटलं, योग्य वेंळ उगवली, की त्या वेंळचं त्या वेंळीं बघूं...
ती वेंळ पुढं आंठवडाभंरातच उगवेल, हें मात्र मला त्या वेळीं ठाऊक नव्हतं.
इथंच तात्कालिक महाभारताचा शेंवट झाला... ... ...
सौ. इंदिराजी मात्र आंकडा लावलेल्या भोंव-यावर जाम खूष दिसत होत्या... ...
असा जेमतेम आठवडाभंर उलटला असेल-नसेल...
एक दिवस सकाळी सकळी च सौ. इंदिराजीं च्या ' मुल्क-ई-मैदान ' चा धंडाका उडाला..., “ अहो...ऐकलंत काय ?...इकडं या बरं लगेच... ...हें कपडे धुलाई यंत्रा चं बघा काय झालंय तें... ...”
मी धांवलो, “ काय झालंय यंत्राला ?...बघूं द्या मला जरा...”
बघितलं तर यंत्र आडव्या दिशेंत जरा लडबडायला लागलं होतं...
मी," कांही नाही... ...यंत्राची समतल पातळी बिघडून तें जरासं तिरकं झालेलं दिसतंय, त्यामुळं तें चालूं केल्यावर जरा लडबडायला लागलंय...याची समपातळी परत ठीक ठाक करायला हंवी...तुचं धुणं उरकलं, की मग सांगा मला...”
सौ. इंदिराजी, “ कांही नको... ...मला हें यंत्र आत्तांच मोडीत कांढायचं नाहीय... ...!!! मी बोलावते कंपनीच्या माणसाला तें बघायला...”
मी कांही न बोलतां विषयाला पूर्णविराम दिला... ...
सौ. इंदिराजी नी दूरध्वनि केल्यावर कंपनी चा मनुष्य आला...त्यानं आधी सौ. इंदिराजी ना सहाशे रुपये पाहणी फी रोंखीनं ओंकायला लावली, आणि मी जें निदान केलेलं होतं तें च परत सौ. इंदिराजी ना सांगितलं... ...
मग त्यानं त्याच्या पोतडीतनं एक चार इंची बबल लेव्हल कांढली...ती यंत्राच्या डोंक्यावर उभी आडवी ठेंवून यंत्राच्या खुरांचे स्क्रू कमीज्यास्त वर खाली करून अर्ध्या तासानं सौ. इंदिराजी ना सांगितलं, “ आतां मशीन चालूं करा मॅडम “...सौ. इंदिराजी नी यंत्र चालूं करून तें लडबडत नसल्याची खात्री केली, आणि तो मेस्त्री मग चालतां झाला... ...
असा एक आंठवडाभंर गुण्यागोविंदानं उलटला असेल नसेल तों पुन्हां एक दिवस भंल्या सकाळीं सौ. इंदिराजीं च्या ' घनगर्ज ' चा धंडाका उडाला, “ जळ्ळ्या मेल्या ह्या कंपन्या, अन् जळ्ळे मेले त्यांचे यंत्रविशारद...एक साधं कामसुध्दां धंड करातां येत नाही मेल्यांना... ...पैसे मात्र वांजवून घ्यायला विसरत नाहीत लेकाचे... ...माझे सहाशे रुपये फुकटचे पंचायचे नाहीत मेल्यांना... ..." काय न् काय.
मी आवाज दिला, “ अहो काय झालंय काय असं म्हणून तोंडाचा पट्टा सुटलाय तुमच्या ?”
सौ. इंदिराजी फिस्कारल्या, “ स्वतः च येऊन बघा तुमच्या अभियांत्रिकीतल्या विशारदांनी कसलं भिकार काम करून ठेंवलंय तें... ...धुलाईयंत्राच्या परत अंगात आलंय... ...म्हणे अभियंते...सगळे एकाच माळेचे मणी...!!!”
मी मग सौ. इंदिराजी नां म्हणालो, “ झालं ना तुमचं तोंड सोडून? आतां व्हा बाजूला तुम्ही...मी बघतो काय करायचं तें...”
सौ. इंदिराजी, “ करां काय तुम्हांला हंवे ते प्रयोग...मला हें यंत्र अजून कमीतकमी दहा वर्षं तरी वापरायचं आहे, हें चांगलं लक्ष्यांत ठेंवा...समजलं ?”
मी उत्तरलो, “ तुम्ही फक्त बाजूला व्हा, अन् बघा आतां फक्त...आपले भीमाप्पा च यंत्राची पातळी एका झंटक्यात कशी नीटनेटकी करून दांखवतात तें... ...”

आतां मात्र सौ. इंदिराजी मला मैदान मोकळं करून देत मुकाट बाजूला संरकल्या...
मी ' चि. भीमाप्पा मेस्त्री ' नां हांक मारली, आणि खेंळण्यातला त्यांचा तो माथ्यावर आंकडा बसवलेला भोंवरा दोरीसकट घेंऊन यायला सांगितलं...
सौ. इंदिराजी डोंळे बारीक करून आम्ही काय काय करतो, तें बघायला लागल्या... ...
मी मग भोंव-याला बसवलेला आंकडा दोरीच्या एका टोंकाला गांठ मारून केलेल्या वळ्यात अडकवला, मग दोरीत ओंवलेली खिट्टी धुलाई यंत्राच्या एका बाजूच्या वरच्या कडेला चिकटवली,सौ. इंदिराजी नां दोरी चिमटीत घट्ट धंरून भोंवरा ओळंब्यासारखा यंत्राच्या कडेवर खाली तळापर्यंत सोडायला सांगितला,चि. भीमाप्पा नां यंत्र ओळंब्यात आहे की नाही तें वांकून बघायला सांगितलं...आणि यंत्राच्या खुरांतले स्क्रू जरूर तितके सैल घट्ट करीत फक्त दहा मिनिटांत चारी बाजूनीं यंत्राची स्थिति अचूक समपातळीत करून दांखवली... ...!!!

आतां मात्र सौ. इंदिराजीं चे डोंळे फांटले, “ अय्या... ... अच्छा...अच्छा...हा उपद्व्याप चाललेला होता तर तुमचा ' पापा ' च्या खेळण्यावर...”

मी हंसलो, “ तुका म्हणे...”

सौ. इंदिराजी नी आतां कपाळाला हात लावला, “ ...चला होऊन जाऊं द्या तुमचं कीर्तन काय तें एकदाचं...”

मी,      तुका म्हणे हें जाण | खेंळण्यापरि खेंळणं

            कॢप्ति लढवितां उपकरण | बहूपयोगी ||

                ... ...काय इंदिराजी ?” 

  

मग मी यंत्राच्या खुरांच्या चारही स्क्रूंच्या आट्यांत गोंदाचे तीन तीन थेंब टांकले, आणि सौ. इंदिराजी नां सांगितलं, “ आतां याची पातळी कधी डळमळणार नाही, आणि तुमचं यंत्रही अजिबात लडबडणार नाही... ...फक्त चार तासांनी यंत्र वापरायला सुरूं करायचं... ...समजलं सगळं ?”

ती करामत बघून सौ. इंदिराजीं चा आं वांसला, आणि बोलती च बंद झाली... ...

त्या क्षणीं त्यांच्या नजरेंत जे भाव उमटले, त्यातनं मला माझ्या ' नस्त्या उचापतीं ' ची पावती केव्हांच वांजवून मिळालेली होती...!!!

सौ. इंदिराजीं च्या तोंडातनं मात्र अवाक्षरही बाहेर पडलं नाही... ... ...!!!

तसं जर झालं, तर मग त्यांना ' इंदिराजी ' कोण म्हणेल ?

 

*************************************************************

-- रविशंकर.

१४ नोव्हेंबर २०२३.


 

No comments:

Post a Comment